Advertisement

मुंबई सेंट्रल, डोंबिवली, कुर्ला स्थानकातील पूल दुरूस्तीसाठी बंद

पश्चिम रेल्वेने ११५ पादचारी पूल आणि २९ पुलांची तपासणी केली होती. यामधील २८ पूल सुरक्षित असल्याचं रेल्वेनं सांगितलं आहे. तर लोअर परेल स्थानकाच्या बाहेरील पूल असुरक्षित आहे.

मुंबई सेंट्रल, डोंबिवली, कुर्ला स्थानकातील पूल दुरूस्तीसाठी बंद
SHARES

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर मालाड आणि दादर येथील पूल बंद करण्यात आला होता. आता मुंबई सेंट्रल, डोंबिवली आणि कुर्ला स्थानकातील पूल दुरूस्तीसाठी बंद केले आहेत. मुंबई आणि उपनगरातील ७३ पादचारी पुलांची तपासणी विविध संस्था आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. 


पूल पाडले

मुंबई सेंट्रल स्थानकात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या पादचारी पुलाचा एक भाग बंद करण्यात आला आहे. हा पूल १५ एप्रिलला सुरू होईल. प्रवाशांना या कालावधीत उत्तरेकडील पादचारी पूल वापरता येईल. अशा प्रकारे डोंबिवली स्थानकातीलही पादचारी पूल दुरूस्तीसाठी बंद केला आहे. याचबरोबर मध्य रेल्वेने कल्याण आणि कसारा स्थानकातील पूल पाडले आहेत. 


पुलांची तपासणी

पश्चिम रेल्वेने ११५ पादचारी पूल आणि २९ पुलांची तपासणी केली होती. यामधील २८ पूल सुरक्षित असल्याचं रेल्वेनं सांगितलं आहे. तर लोअर परेल स्थानकाच्या बाहेरील पूल असुरक्षित आहे. या पुलाच्या दुरूस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर बांद्रा कलानगर, अंधेरी, माहीम, वसई, मालाड स्थानकातील पूल आणि पादचारी पुलांच्या दुरूस्तीचं काम जुलैमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, प्रभादेवी, दादर, खार, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड स्थानकातीलही पादचारी पुलांची दुरूस्ती करण्यात येणार असल्याचं रेल्वेने सांगितलं आहे. पश्चिम रेल्वेच्या चार स्थानकामध्ये नवीन पूल उभारण्यात येणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. 



हेही वाचा - 

रन वेच्या दुरूस्तीचं काम पूर्ण, रविवारपासून मुंबई एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू

रे रोड ठरलं वायफाय असलेलं हजारावं हायफाय स्टेशन!




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा