Advertisement

मुंबईत धूर फवारणी होणार बंद?


मुंबईत धूर फवारणी होणार बंद?
SHARES

डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी धुर फवारणी केली जाते. पण या धुर फवारणीमुळे दम्याचा होणारा त्रास लक्षात घेता आता धूर फवारणीचं प्रमाण हळूहळू कमी करण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती महापलिका आयुक्त अजेाय मेहता यांनी सभागृहात दिली. यापुढे जिथे-जिथे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढलेलं असेल, तिथे औषध टाकून डासांची उत्पत्तीच कमी करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.


जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष

डासांना प्रतिबंध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धुर फवारणीतील धुरामुळे नागरिकांना अस्थमा सारखे आजार होत असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवला आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने याचं नियोजन करून धुर फवारणीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात असल्याचं आयुक्तांनी महापालिका सभागृहात अर्थसंकल्पावर निवेदन करताना सांगितलं.


२ हजार १०० लोकांवर गुन्हे दाखल

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहे. जिथे जिथे पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढेल, तिथे औषध फवारणी करून डासांना प्रतिबंध केला जाईल. मात्र, ज्या भागात पाणी साचून डासांचे प्रमाण वाढेल, त्याला जी कोणी व्यक्ती अथवा संस्था जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मागील वर्षी एकूण १७ हजार ८०० लोकांना नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. त्यातील २ हजार १०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्याकडून ८० लाखांचा दंड वसूल करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंबईतील यापूर्वी केवळ २७ धुर फवारणी मशीन होत्या. परंतु दहा वर्षांपूर्वी २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे धुर फवारणी मशीन खरेदी करण्यात आल्या. यासर्व मशीन सध्या कार्यरत आहेत. याशिवाय सात परिमंडळांमध्ये एक याप्रमाणे वाहनावरील धुर फवारणी मशीन
उपलब्ध आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा