दादर स्थानकातील पादचारी पूल दरूस्तीसाठी बंद

दादर स्थानकातील चर्चगेटच्या दिशेनं जाणारा पादचारी पूल दरूस्तीच्या कामासाठी १४ मे मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. आयआयटी मुंबईच्या ऑडिटनंतर हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SHARE

दादर स्थानकातील चर्चगेटच्या दिशेनं जाणारा पादचारी पूल दरूस्तीच्या कामासाठी १४ मे मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. आयआयटी मुंबईच्या ऑडिटनंतर हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर स्थानकातील पूल जीर्णवस्थेत असून हा पूल तोडणं गरजेचं आहे, असं आयआयटी मुंबईच्या अहवालात म्हटलं आहे


१९९३ साली बांधकाम

दादर पश्चिममधील रेल्वे प्रवासी या पुलाचा दादर पूर्व स्थानकात जाण्यासाठी वापर करतात. हा पूल ६.५ मीटर रुंद असून या पुलाचं १९९३ साली बांधकाम करण्यात आलं होतं. त्यामुळं या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महत्वाचा पूल

दरम्यान, दादर पूर्व आणि पश्चिमेकडील प्रवाशांना जोडणारा हा दादर स्थानकातील महत्वाचा पूल आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांची या पुलावर मोठ्याप्र माणात गर्दी होते. मात्र, दुरूस्तीसाठी हा पूल बंद केला जाणार असल्यानं प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.हेही वाचा -

मुंबईत शाळेचे डबे पोचवणाऱ्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

दादरमधील पोलीस वसाहतीत आग, १५ वर्षीय मुलीचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या

दादर स्थानकातील पादचारी पूल दरूस्तीसाठी बंद
00:00
00:00