Advertisement

चिंताजनक ! ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे

. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ही १६,९५,२०८ झालीय. राज्यात सध्या ८८,५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

चिंताजनक ! ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे
SHARES

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्येत चढ उतार होत आहे. मात्र गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या दोन आकडी होती.  मात्र आज दिवसभरात मृतांचा आकडा १११ वर जाऊन पोहचला. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ही ४७,५७ एवढी झाली आहे.

हेही वाचाः- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

दिवशभरात ५,६०० नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही १८,३२,१७६ झालीय. तर ५,०२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ही १६,९५,२०८ झालीय. राज्यात सध्या ८८,५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू असतानाच, एक आनंदाची बातमी मिळाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी पुढच्या आठवड्यापासून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Mass Vaccination) करण्याचे आदेश दिले आहेत. तर जग कोरोनावरचं औषध शोधत असतांनाच रशियाने ‘स्पुतनिक-V’ (Sputnik V) औषध शोधून बाजी मारल्याचा दावा केला होता. त्याचं मानवी परिक्षणही यशस्वी ठरल्याचा दावाही रशियाने केला होता. हे औषध खुद्द पुतीन यांच्या मुलीलाच दिलं गेल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात भारतात ३० कोटी लोकांचं लशीकरण होणार आहे. जुलै २०२० पर्यंत ५० कोटी डोस बनवण्याची आणि २५ कोटी लोकांचं लशीकरण करण्याची योजना आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा