Advertisement

मुंबई हायकोर्टाला मिळाले ४ नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार मुंबई उच्च न्यायालयात ४ नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती होणार आहे.

मुंबई हायकोर्टाला मिळाले ४ नवे न्यायाधीश
SHARES

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार मुंबई उच्च न्यायालयात ४ नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती प्रदान केली असून बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.

कुणाचा समावेश? 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने एकूण ५ वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करत राष्ट्रपतींनी अ‍ॅड. किलोर, अ‍ॅड. घरोटे, अ‍ॅड. नितीन सूर्यवंशी आणि अ‍ॅड. मिलिंद जाधव अशा ४ जणांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 

'अशी' झाली निवड 

मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी ४ मे २०१८ रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी एकूण १० वकिलांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला सुचविली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामना यांचा समावेश असलेल्या या कॉलेजियमने आवश्यक बाबी पडताळल्यानंतर ५ नावे अंतिम केली. त्यातील ४ वकिलांना नवीन अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

अपुरं संख्याबळ

या नियुक्तीनंतर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या ६८ झाली आहे. उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठासाठी न्यायमूर्तींची ९४ पदं मंजूर करण्यात आली आहे. त्यातुलनेत हे संख्याबळ अपुरं आहे. शिवाय पुढच्या वर्षी ८ न्यायमूर्ती निवृत्त होणार असल्याने न्यायमूर्तींची संख्या घसरून ६० वर येईल. 

 


हेही वाचा-

चौकशी राज ठाकरेंची, झोप उडाली पोलिसांची

मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल होणार स्मार्टRead this story in हिंदी or English
संबंधित विषय