Advertisement

कुर्ल्याच्या चाळीत सिलिंडर स्फोट, ४ वर्षीय मुलीचा मृत्यू


कुर्ल्याच्या चाळीत सिलिंडर स्फोट, ४ वर्षीय मुलीचा मृत्यू
SHARES

कुर्ला पश्चिमेकडील एका चाळीतील घरात गुरुवारी संध्याकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर २१ वर्षीय तरूण जखमी झाला आहे.


कधी लागली आग?

जुना कम्पाऊंडमधील बैलबाजार परिसरातील क्रांती नगरात एका चाळीत संध्याकाळी ५.२१ वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. अवघ्या काही सेकंदत ही आग भडकली. या आगीत अनुष्का चौरासिया ही ४ वर्षीय मुलगी भाजली. तिला तातडीनं राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी अनुष्काला मृत घोषित केलं. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


तरूण जखमी

त्याशिवाय या आगीत रवी परमार हा २१ वर्षीय तरुणही जखमी झाला असून त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजावाडी रुग्णालयातील डॉ. रवींद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी याची प्रकृती स्थिर आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा