Advertisement

माजी नगरसेवकांना मोफत बेस्ट पास


माजी नगरसेवकांना मोफत बेस्ट पास
SHARES

मुंबई - बसमधून आमदार - खासदारांना दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवासानंतर आता माजी नगरसेवकांनाही मोफत प्रवास करण्याच्या ठरावाला महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. शिवसेना सदस्य मिराज शेख यांनी मंगळवारी माजी नगरसेवकांना मोफत बेस्टपास मिळावा, अशी मागणी केली होती. या सुचनेला भाजपानं विरोध केला. मात्र काँग्रेस, समाजवादी पार्टीनं मोफत बेस्टपासच्या बाजूनं कौल दिल्यानं महापौर स्नेहल आंबेकर यांनी ठरावाची सूचना मंजूर केली. माजी आमदारांप्रमाणे माजी नगरसेवकांनाही बेस्टमधून प्रवास करण्यासाठी मोफत पास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मेहीराजउद्दीन शेख यांनी केली. 

आमदार, खासदारांच्या पासाचे पैसे राज्य शासन भरते असे सांगत दिलीप पटेल यांनी या ठरावाच्या सूचनेला विरोध केला. तर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मुळात किती नगरसेवक बसमधून प्रवास करतात, असा सवाल केला. तसंच याचा आर्थिक भार पालिकेवर पडतो. पर्यायानं जनतेचा पैसे वाया जात असल्यानं नगरसेवकांना मोफत पास देणंच चुकीचं आहे, असं कोटक यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नगरसेवक नौशिर मेहता यांनी बेस्टची आर्थिक स्थिती पाहता मोफत पास देणे बंद करण्याची मागणी केली.

दरम्यान शिवसेनेचे संजय पवार यांनी अनेक नगरसेवक बसनं प्रवास करत असल्याचं सांगत मिराज शेख यांच्या मोफत बसपासच्या सूचनेला समर्थन दिलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा