Advertisement

ढोल, ताशाचा 'आवाज' डिजेवरही भारी, ध्वनी प्रदूषणात घातली भर


ढोल, ताशाचा 'आवाज' डिजेवरही भारी, ध्वनी प्रदूषणात घातली भर
SHARES

मुंबईभर सध्या गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेशोत्सव साजरा करताना त्याचा इतरांना त्रास होऊ नये, कायद्याचे उल्लंघन होऊ नये, याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळांसोबत उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येकावरच येते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही यावर्षी दीड दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान ध्वनी प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे या ध्वनी प्रदूषणात डिजे नव्हे, तर ढोल, ताशाने भर घातली आहे. 

दरवर्षीनुसार 'आवाज फाऊंडेशन'च्या सुमायरा अब्दुल्लाली यांनी केलेल्या पाहणीत ही बाब पुढे आली आहे. संस्थेने गेल्या शनिवारी मध्यरात्रीपर्यंत 'शांतता क्षेत्र'(सायलन्स झोन)मधील ध्वनी प्रदूषणाची पातळी नोंदवली. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनी प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट झाले.



यासंदर्भात अब्दुल्लाली म्हणाल्या की शनिवारी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झाले. या ध्वनी प्रदूषणाने गेल्या वर्षी अनंत चतुर्थीला झालेल्या ध्वनी प्रदूषणाचीही पातळी ओलांडली. गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाची पातळी ११४ डेसिबल एवढी होती. मात्र शनिवारी ध्वनी प्रदूषणाची पातळी ११६.८ डेसिबल इतकी वाढली.

ध्वनी प्रदूषणाची मोजणी रात्री १० ते १२ वाजेदरम्यान करण्यात आली. ही सर्व मोजणी शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धर्मिक स्थळ, न्यायालय इत्यादी 'शांतता क्षेत्रा'त करण्यात आली. दहा वाजेनंतर प्रामुख्याने ढोल, ताशाच्या कडकडाटाने ध्वनी प्रदूषणात भर घातली. शहरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पोलिसांच्या उपस्थित ढोल, ताशे, बॅन्जो, डिजेचा वापर करण्यात आला होता.



हे देखील वाचा -

हॉर्न 'नॉट ओके' प्लीज...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा