ध्वनी प्रदूषण रोखा, दुष्परिणाम टाळा

 Mumbai
ध्वनी प्रदूषण रोखा, दुष्परिणाम टाळा

घाटकोपर - मुंबईत ध्वनी प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेत घाटकोपर पोलीस पुढे सरसावले आहेत. ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये बहिरेपणाचा त्रास वाढत आहे. त्यामुळे जनतेमध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम घाटकोपर पोलीस ठाणे यांनी सुरू केली आहे. येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करणारे पत्रक देखील प्रकाशित केले आहेत.

पारंपरिक उत्सवामध्ये अधिक प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषणामुळे मनवाच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करणारे माहिती पत्रके प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच ध्वनी प्रदूषण केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 15 आणि 19 अन्वये ध्वनी प्रदूषण नियमनुसार आणि नियंत्रण नियम 2000 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या कारवाई अंतर्गत 5 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी घाटकोपरच्या जनतेने पुढे येण्याचे आवाहन घाटकोपरमधील चिरागनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी केले आहे.

Loading Comments