Advertisement

... म्हणून बिहार पोलिसांना क्वारंटाईन केलं, पालिकेचा खुलासा

राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्‍यक्तिंसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे

... म्हणून बिहार पोलिसांना क्वारंटाईन केलं, पालिकेचा खुलासा
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी गोरेगांव (पूर्व) येथील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप ८ विश्रामगृहात थांबले होते. त्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाला मिळाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने त्यांना क्वारंटाईन केल्याचे स्पष्ठ केले आहे.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरण! तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्याला केलं १५ दिवसांसाठी क्वारनटाईन

भारतात  कोविड  संक्रमणामुळे देशांतर्गत प्रवास केल्यास १४ दिवसांचे क्वारंटाईन केले जावे असे नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेच्या पथकाने, बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणार्या व्यक्तिंसाठी लागू असलेली गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबतची संपूर्ण प्रक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी दिली. राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्‍यक्तिंसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. त्यासोबतच, पालिकेने राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक असल्याचे कळवले आहे.

हेही वाचा- सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिसांचा तपास ठप्प, ‘ते’ ४ अधिकाऱीही क्वारनटाईन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा