Advertisement

गोदरेजने लक्ष्मीबाग नाल्याची भिंत फोडली


गोदरेजने लक्ष्मीबाग नाल्याची भिंत फोडली
SHARES

लक्ष्मीबाग नाल्याचं रुंदीकरण करून संरक्षक भिंत उभारलेली असतानाच आता या नाल्यावरील भिंतच गोदरेज कंपनीने फोडली आहे. गोदरेजच्या जागेवर मोठी टाऊनशीप उभी केली जात असून टाऊनशीपच्या बांधकामासाठी पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. ही पर्जन्य जलवाहिनी लक्ष्मीबाग नाल्याला जोडली जात आहे. त्यासाठीच नाल्यांची संरक्षक भिंत तोडल्याचं म्हटलं जात आहे.


राष्ट्रवादीचा तीव्र आक्षेप

घाटकोपर पूर्व असलेल्या लक्ष्मीबाग नाल्याला गोदरेजमधून येणारी पर्जन्य जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. यासाठी गेल्या ८ दिवसांपासून खोदकाम करून पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे ही जलवाहिनी लक्ष्मीबाग नाल्याला जोडण्यासाठी याची संरक्षक भिंत फोडण्यात आली आहे. त्याला राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेविका आणि महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.खोदकामास मनाई

एका बाजूला मुंबईत १५ मेनंतर कोणतंही खोदकाम करण्यास परवानगी नसताना गोदरेजच्या माध्यमातून खोदकाम केलं जात आहे. तसंच यासाठी महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केलं जात आहे. त्यामुळे याठिकाणच्या अशाप्रकारच्या खोदकामामुळे आसपासच्या परिसरात पाणी तुंबलं, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल राखी जाधव यांनी केला आहे. याबाबत आपण उपायुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणत त्यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचं जाधव यांनी सांगितलं.


संरक्षित जागेचा दावा

गोदरेज कंपनीचं ते बांधकाम त्यांच्या भागात असून त्यामध्ये बाहेरच्यांना प्रवेश नाही. सार्वजनिक जागेवरील बांधकामासाठी केलेलं खोदकाम हे १५ मेच्यापूर्वी बूजवून पूर्ववत करणं आवश्यक आहे. परंतु गोदरेज कंपनीची स्वत:च्या संरक्षित जागेतून असल्यानं त्यांना हा नियम लागत नसल्याचं महापालिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.हेही वाचा-

मुसळधार पावसासाठी महापालिका आपत्कालिन यंत्रणा सज्ज

मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईडRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा