Advertisement

'गोकुळ 'चं दूध २ रुपयांनी स्वस्त

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने गोकुळ दुधाच्या मुंबईतील किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर गुरूवार २१ जूनपासून लागू होणार आहेत.

'गोकुळ 'चं दूध २ रुपयांनी स्वस्त
SHARES

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने गोकुळ दुधाच्या मुंबईतील किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर गुरूवार २१ जूनपासून लागू होणार आहेत. संघाच्या या निर्णयाचा मुंबईतील ग्राहकांना निश्चितच फायदा होणार आहे.


किंमत किती?

गोकुळने गाईच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांची कपात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४४ रुपये प्रति लिटर किंमतीला मिळणारं दूध मुंबईत प्रति लिटर ४२ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर अर्धा लिटर दुधाची किंमत २१ रुपये एवढी असेल.


कारण काय?

दुधाचे नवीन दर २१ जून २०१८ पासून मुंबईसहित संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. मुंबईतील दुधाची मागणी घटल्याने संघाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. सद्यस्थितीत गोकुळ दूध दररोज ४.५ लाख लिटर दुधाचं उत्पादन करते.



हेही वाचा-

दुधाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं 'फुकट' आंदोलन

तर, मंत्रालयापुढं फुकट दूध वाटप



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा