Advertisement

सुगंधी दूध नाहीच, विद्यार्थ्यांना मिळणार चणे-शेंगदाणे

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना पोषक आहाराबरोबरच पुरक आहार वितरण योजनेतंर्गत चिक्की देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. परंतु चिक्की पुरवण्यासाठी कुठलीही संस्था पुढे येत नसल्याने चिक्कीला पर्याय म्हणून चणे, शेंगदाणे यासह मनुका व खारिक असा खाऊ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

सुगंधी दूध नाहीच, विद्यार्थ्यांना मिळणार चणे-शेंगदाणे
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून चणे-शेंगदाणे आणि सुगंधी दूध देण्याचे दोन पर्याय सुचवण्यात आले होते. यापैकी पोषक आहार म्हणून विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाऐवजी चणे-शेंगदाणेच देण्यास महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हाती चणे-शेंगदाणे पडणार आहेत.


चिक्कीला पर्याय पोषक खाऊ

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना पोषक आहाराबरोबरच पुरक आहार वितरण योजनेतंर्गत चिक्की देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. परंतु चिक्की पुरवण्यासाठी कुठलीही संस्था पुढे येत नसल्याने चिक्कीला पर्याय म्हणून चणे, शेंगदाणे यासह मनुका व खारिक असा खाऊ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.


सर्वपक्षीय गटनेत्यांची मान्यता

याबाबतचा प्रस्ताव मागील गटनेत्यांच्या सभेत राखून ठेवण्यात आला होता. परंतु मंगळवारी झालेल्या सभेत सुगंधी दुधाच्या तुलनेत चणे व शेंगदाण्यासह मनुका, खारिक हा खाऊ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याला सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी मान्यता दिल्याचं समजत आहे.


प्रस्ताव मंजूर

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सर्व गटनेत्यांच्या संमतीने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चणे व शेंगदाणे देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिका शाळांमधील मुलांना चणे व शेंगदाणे सोबत मनुका आणि खारिक असा सुका खाऊ मिळणार आहे.


घरी नेण्यास परवानगी

हा खाऊ विद्यार्थी शाळेत खाऊ शकतात किंवा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी नेऊन आपल्या भावंडांनाही खायला देऊ शकतात. ज्यामुळे गरीब घरातील मुलांना चांगलं खाद्य मिळणार आहे.


कुणाला मिळणार खाऊ?


प्राथमिक शाळेतील विद्यार्थी

  • पूर्व प्राथमिक शाळा ते इयत्ता ५ वी : १ लाख ९७ हजार ५७९
  • इयत्ता ६ वी ते ८ वी : १ लाख २ हजार ९१७


माध्यमिक शाळेतील विद्यार्थी

  • इयत्ता ५ वी : १ हजार ६९७
  • इयत्ता ६ वी ते १० वी : ३६ हजार ८२७

हेही वाचा-

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चणे-शेंगदाणे

महापालिका शाळांतील विद्यार्थी खाणार चणे, शेंगदाणे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा