Advertisement

अखेर 'या' तारखेपासून राज्यात जीम सुरू होणार

केंद्र आणि राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करून जीम सुरू कऱण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिममध्ये जाताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन कऱणं अनिवार्य असेल.

अखेर 'या' तारखेपासून राज्यात जीम सुरू होणार
SHARES

अनलॉकच्या ५ व्या टप्प्यात हळूहळू राज्यात सर्व खुलं होत आहे. मात्र, जीम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. जीम सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारनं जीम उघडण्याची परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात २५ आॅक्टोबरपासून जीम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करून जीम सुरू कऱण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिममध्ये जाताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन कऱणं अनिवार्य असेल. याशिवाय जिममध्ये थर्मल स्क्रिनिग आणि सॅनिटायझेशन अत्यावश्यक असेल. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेऊन कंटेन्मेंट  झोन वगळता राज्यात जिम सुरू कऱण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे. 

राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवीन ७५३९ रुग्ण आढळले. तर  १६,१७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या १६ लाख ३१ हजार ८५६ एवढी झाली आहे. राज्यात मृत्यू दर हा २.६४ टक्के आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार

खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा