प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला हमीद ६ वर्षांनी मुंबईत परतणार

मुंबईत राहणाऱ्या हमीदची एका पाकिस्तानी तरूणीसोबत फेसबुकवरून मैत्री झाली होती. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याने हमीद या तरुणीला भेटण्यासाठी २०१२ मध्ये थेट अफगानिस्तानात गेला. तिथून तो पुढं पाकिस्तानात दाखल झाला. परंतु तरूणीसोबत त्याच प्रेम फुलण्याआधीच तो पाकिस्तानी पोलिसांच्या तावडीत सापडला होता.

Hamid Nihal Ansari
SHARE

फेसबुक फ्रेंडच्या प्रेमात पडून अफगाणीस्तानमार्गे पाकिस्तानात जाऊन अडकलेला हमीद अन्सारी (३३) ३ वर्षांची शिक्षा भोगून पुन्हा भारतात परतणार आहे. हमीद मंगळवारी वाघा बाॅर्डरवरून पुन्हा भारतात दाखल होणार आहे.

हमीद अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्याची आई फौजिया अन्सारी यांनी न्यायालयात धाव घेत त्याचा ठावठिकाणी शोधून काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर भारतीय तपास यंत्रणांच्या चौकशीत हमीद पाकिस्तानात असल्याचं पुढं आलं होतं.


कसा गेला होता पाकिस्तानात?

मुंबईत राहणाऱ्या हमीदची एका पाकिस्तानी तरूणीसोबत फेसबुकवरून मैत्री झाली होती. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याने हमीद या तरुणीला भेटण्यासाठी २०१२ मध्ये थेट अफगानिस्तानात गेला. तिथून तो पुढं पाकिस्तानात दाखल झाला. परंतु तरूणीसोबत त्याच प्रेम फुलण्याआधीच तो पाकिस्तानी पोलिसांच्या तावडीत सापडला होता.


३ वर्षांची शिक्षा

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि कोहाट येथील स्थानिक पोलिसांनी हामीदला अटक केली. पाकिस्तानी बनावट ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपाखाली १५ डिसेंबर २०१५ मध्ये लष्कराच्या कोर्टानं त्याला ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून हमीद पेशावर तुरूंगात शिक्षा भोगत होता. त्याची शिक्षा १५ डिसेंबर २०१८ ला पूर्ण झाली.


परतीचा मार्ग मोकळा

मात्र, कायदेशीर प्रक्रिया खोळंबल्याने त्याला भारतात पाठवण्यात येत नव्हतं. त्यानंतर पेशावर उच्च न्यायालयानं हमीदला महिन्याभरात भारतात पाठवण्याचे आदेश पाकिस्तानी सरकारला दिल्यानंतर हमीदचा परतीचा मार्ग मोकळा झाला.

भारतीय गुप्तहेर असलेल्या हमीदने पाकिस्तानात बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता. त्याच्याकडे खोटी कागदपत्रंही सापडली होती. परंतु त्याची शिक्षा पूर्ण झाल्याने त्याला लवकरच भारताच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. अशी माहिती पाकिस्तानी पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली.हेही वाचा-

गुप्तांगात अंमलीपदार्थ लपवून आणणाऱ्या महिलेची निर्दोष मुक्तता

दाऊदला लागोपाठ दोन झटके, भारताला मिळणार पुतण्याचा ताबासंबंधित विषय
ताज्या बातम्या