Advertisement

दादर स्थानकाबाहेरील फेरीवाले ठरताहेत त्रासदायक, रहिवाशाने टाकली फेसबुक पोस्ट

मुंबईतल्या गजबजलेल्या दादरमधील कबुतखाना येथील फेरीवाले पादचाऱ्यांना प्रचंड त्रासदायक ठरत आहेत.

दादर स्थानकाबाहेरील फेरीवाले ठरताहेत त्रासदायक, रहिवाशाने टाकली फेसबुक पोस्ट
SHARES

मुंबईतल्या गजबजलेल्या दादरमधील कबुतरखाना येथील फेरीवाले पादचाऱ्यांना प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. कबुतरखाना परिसर दादर स्थानकानजीक असल्यामुळं इथं प्रवाशांसह पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीत फेरीवाले मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत. त्यामुळं 'या फेरीवाल्यांना हटवा नाहीतर स्थानिक जनतेच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल' असं आवाहन करणारी एक पोस्ट फेसबुकवरून कुणाल वाडेकर नावाच्या व्यक्तीनं शेअर केली आहे.


या पोस्टमध्ये फेरीवाल्यांचे फोटो शेअर करत 'दादर-कबुतर खाना भवानी शंकर रोड येथील जे फेरीवाले पाणीपुरी, मोबाइल कव्हर, मेवाड आईस्क्री, पान टपरी, चायनिस पकोडे, चायनिस राईस असे धंदे करतात ते जास्त तेथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अरेरावी करत असतात. तसं, तेथे जनतेला भर रस्त्यातून जावं लागतं त्यामुळं जनतेला नाहक त्रास होत आहे. संध्याकाळच्या वेळेस ट्रॅफिकमुळं चालायला सुद्धा त्रास होतं आहे. माझी स्थानिक दादर (सैतान चौक्की) पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका यांना विनंती आहे, आपण यांच्यावर कारवाई करून तेथील रास्ता मोकळा करावा नाहीतर तेथील स्थानिक जनतेच्या उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागेल', असं कुणाल वाडेकर यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या डबेवाल्यांची मोनो आणि मेट्रोतून डबे नेण्याची मागणी

World Vadapav Day: 'असा' झाला वडापावचा जन्म!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा