Advertisement

World Vadapav Day: 'असा' झाला वडापावचा जन्म!

२३ ऑगस्ट म्हणजे जागतीक वडापाव दिन. याच दिवशी मुंबईकरांनी प्रथम वडापावची चव चाखली होती.

World Vadapav Day: 'असा' झाला वडापावचा जन्म!
SHARES

२३ ऑगस्ट म्हणजे जागतीक वडापाव दिन. याच दिवशी मुंबईकरांनी प्रथम वडापावची चव चाखली होती. १९६६मध्ये जन्माला आलेला वडापाव आता जगप्रसिद्ध झाला आहे. मुंबईत ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वडापाव बनतात. वडापाव १० ते १५ रुपयांत उपलब्ध होत असल्यानं मुंबईकरांची त्याला प्रचंड मागणी आहे. तसंच जगात याला बॉम्बे बर्गर म्हणूनही ओळखलं जात आहे. मात्र, आकारानं लहान आणि किंमतही कमी असलेल्या या वडापावचा जन्म कसा झाला याबाबत अजूनही कोणाला माहिती नाही. तर चला जाणून घेऊया मुंबईत कसा जन्माला आला 'वडापाव'...

१९६६ साली मुंबईतल्या दादर स्थानकाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. यावेळी दादरमध्ये सुधाकर म्हात्रेंचाही वडापाव सुरू झाल्याचं मानलं जात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. त्यानंतर हळूहळू वडापाव मुंबईकरांच्या पसंतीत आला. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. 

वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जात होता. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज १८ तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ ६ ते ७ तास मिळायचा. दुपारी २ वाजताच्या सुमारास गाडी लागायची आणि ८-८.३० पर्यंतच ती गाडी सुरु असायची.

दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र, सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावानं कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत.

१९७० ते १९८० च्या काळामध्ये मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्यानं अनेक तरुण वडापावच्या गाडीकडं रोजगाराचं आणि पोट भरण्याचं साधन म्हणून बघू लागले. त्यानंतर हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेनं पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे हे कायमच मराठी माणसानं उद्योगात उतरावं या मताचे होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली.

उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असं धोरण घेत सेनेनं एकाप्रकारे वडापावचं राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केलं. 'शिववडा' हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेनं अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवलं.



हेही वाचा -

मुंबईच्या डबेवाल्यांची मोनो आणि मेट्रोतून डबे नेण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी ज्योतिरादित्य सिंधीया यांची निवड



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा