Advertisement

वडापावला नवा तडका, मुंबईतील 'हे' १० हटके वडापाव आणतील तुमच्या तोंडाला पाणी

दर पाच मैलावर जशी भाषा बदलते, तसा वडापावचाही अवतार बदललेला असतो. भाजीची चव, त्यासोबत दिली जाणारी विशिष्ट प्रकारची चटणी यामुळे आपापल्या वडापावला वेगळी ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न अनेकांनी केला आहे.

वडापावला नवा तडका, मुंबईतील 'हे' १० हटके वडापाव आणतील तुमच्या तोंडाला पाणी
SHARES

अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांमध्ये वडापावचा उल्लेख प्राधान्यानं करावा लागेल. सध्याच्या धावपळीच्या युगात सहज कुठेही आणि कधीही उपलब्ध असणारा हा पोटभरू पदार्थ आता केवळ भूक भागविणे इतक्या प्राथमिक उपयोगापुरता मर्यादित राहिलेला नाही. दर पाच मैलावर जशी भाषा बदलते, तसा वडापावचाही अवतार बदललेला असतो. भाजीची चव, त्यासोबत दिली जाणारी विशिष्ट प्रकारची चटणी यामुळे आपापल्या वडापावला वेगळी ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न अनेकांनी केला आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेगळ्या प्रकारच्या वडापावची ओळख करून देणार आहोत. हे वडापाव तुम्ही एकदा का होईना पण ट्राय केलेच पाहिजेत.


) मॅगी वडापाव

मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेलच. इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणाऱ्या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. यापैकीच एक आहे घाटकोपरमधील लक्ष्मण ओम वडापाव. आता तुम्ही म्हणाल यात काय खास? पण इतर वडापावसारखा हा वडापाव नाही.

मॅगी वडा पाव पहिल्यांदाच मॅगी आणि वडापाव हे दोन वेगळे पदार्थ एकत्र करून मॅगी वडापाव तयार करण्यात आला. हो... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. मॅगी वडापाव... आतून सॉफ्ट आणि बाहेरून स्क्रिस्पी असा हा वडापाव... आहे की नाही भन्नाट प्रकार... वडापाव बनवण्यासाठी स्पेशल मसाल्यांचा वापर केला जातो. हा वडापाव तुम्हाला त्यांनी बनवलेल्या चटणीसोबत सर्व्ह केला जातो.


कुठे लक्ष्मण ओम वडापाव, १९, बिल्डींग १०४गरोडिया नगरघाटकोपर (पू.)
कधी सकाळी ९ ते रात्री ९.३०
किंमत अंदाजे १०० दोघांचे
)


) चिवडा वडापाव

१९७३ मध्ये हा वडापाव स्टॉल सुरू झाला होता. इथं देण्यात येणारा वडापाव हा चिवड्यासोबत दिला जातो. लसणाची चटणी, कापलेली कैरी, चणे, कोथिंबीर आणि कॉर्नफ्लेक्स यापासून हा चिवडा बनवलेला असतो. त्यामुळे हा वडापाव खाण्याची मजा काही औरच. वडापावसोबत कॉनफ्लेक्स म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला क्रंचिनेसचा अनुभव येईल. वडापाव खाताना मध्ये-मध्ये येणाऱ्या कैरीच्या तुकड्यांची चव जिभेवर दिर्घकाळ राहते. ठाकूर स्नॅक्स इथं दिवसाला अंदाजे १००० वडापाव विकले जातात.

कुठे : ठाकूर स्नॅक्स (ठाकूर वडापाव), पी.पी. चेंबर्सच्या पाठी, डोंबिवली

कधी : सकाळी १० ते रात्री १०

किंमत : अंदाजे २५ ( दोघांचे)


) चकली आणि लेस वडापाव

चीज वडापाव, सेजवान वडापाव अशा अनेक प्रकारच्या वडापावचा आस्वाद तुम्ही घेतला असेल. पण तुम्ही कधी वडापाव आणि चकली हे दोन वेगवेगळे प्रकार एकत्र खाल्ले आहेत का? नाही? मग वडाळा इथल्या राजेश प्रोविजन स्टोअरमध्ये तुम्हाला हा भन्नाट वडापाव खायला मिळेल.

राजेश प्रोविजन स्टोअर वडापावच्या पावामध्ये सुरुवातीला ग्रीन चटणी, रेड चटणी लावली जाते. त्यावर चीजचा स्लाईज ठेवला जातो. मग चकली ठेवून त्यात वडा टाकून सर्व्ह केला जातो. या वडापावसोबतच लेस वडापावचा देखील आस्वाद तुम्हाला घेता येईल. चकली वडापावप्रमाणे यात लेस टाकून तुम्हाला वडापाव सर्व्ह केला जाईल

कुठे : राजेश प्रोविजन स्टोअर, आंद्र शाळेच्या समोर, लोकमान्य टिळक शाळेच्या पुढे, वडाळा

कधी : सकाळी १० ते रात्री ९

किंमत : अंदाजे ५० ( दोघांचे)


) चीज फॉनडू वडापाव

वडापावचा आणखी एक भन्नाट प्रकार म्हणजे चीज वडापाव. तुम्ही म्हणाल चीज वडापाव काही नवीन नाही. तो कुठेही मिळतो. वडापावमध्ये चीज स्लाईज असते किंवा किसलेलं चीज टाकून सर्व्ह केला जतो. पण हा चीज वडापाव हटके आहे. कसा तो तुम्हीच बघा...


पाहिलात? आहे की नाही भन्नाटचीज प्रेमींसाठी तर हा वडापाव पर्वणीच आहेछोटे छोटे (मिनी) झणझणीत ७-८ वडापाव तुम्हाला एका बाऊलसोबत सर्व्ह केले जातातया बाऊलमध्ये स्पेशल बनवलेलं चीज असतंतुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की वडापाव अख्खाच्या अख्खा चीजनं भरलेल्या एका बाऊलमध्ये डिब करायचेत आणि त्यांचा आस्वाद घ्यायचाय

कुठे : एमआरपी, तिसरा मजला, ओम हिरा पन्ना मॉल, ओशिवरा, अंधेरी

कधी : सकाळी १० ते रात्री ९

किंमत : अंदाजे ७०० ( दोघांचे)


) जैन वडापाव

बटाटा वडा म्हटला की बटाटा आलाच. पण जैन समाज बटाटा खात नसल्यानं त्यांच्यासाठी हा खास वडापाव तयार करण्यात येतो. पण यात बटाट्याच्या बदली केळ्याचा वापर केला जातो. यात कच्ची केळी स्मॅश करून त्याला कढीपत्ता आणि राई यांचा तडका दिला जातो. या मिश्रणाचा एक गोळा करून चण्याच्या पिठात बुडवून तो तळला जातो. अशा प्रकारे जैन वडापाव तयार होतो

कुठे : टिप टॉप, खाऊ गल्ली, टिळक रोड, घाटकोपर (पू.)

वेळ : सकाळी १० ते रात्री ९

किंमत : अंदाजे ३० ( दोघांचे)


६) चिकन वडापाव

आम्ही आतापर्यंत तुम्हाला व्हेज वडापाव सांगितले. पण तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर हा वडापाव फक्त तुमच्यासाठीच आहे. माहिमच्या मिडलँड रेस्टॉरंटच्या बाजूला असलेल्या स्टॉलवर तुम्हाला चिकन वडापाव मिळेल. अब्बुजार कुरेशी यांचा हा स्टॉल आहे. त्यांच्याकडे शामी या नावानं हा वडापाव ओळखला जातो

उकडलेल्या बटाट्यांमध्ये हर्ब्स टाकले जातात. त्याला बॉईल्ड चिकन स्ट्रिप्सनं कवर केले जाते. त्यानंतर अंड्यामध्ये डिप करून तव्यावर तळले जाते. तिखट चटणीसोबत गरमा गरम वडापाव सर्व्ह केला जातो. यासोबत लिंबू आणि कांदा दिला जातो.

कुठे : मिडलँड रेस्टॉरंटच्या बाजूला, माहिम दर्ग्याला जाताना, एल. जे. रोड, माहीम

वेळ : दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत

किंमत : २५ ( दोघांचे)


७) बेकन वडापाव

नॉनव्हेज प्रेमींसाठी आणखी एक वडापाव आहे. पण हा वडापाव चिकनपासून नाही तर बेकनपासून बनवण्यात येतो. डुकराच्या मासापासून बेकन बनवलं जातं. बेकनपासून बनवलेल्या वड्याला बेकनचे आवरण लावले जाते. त्यानंतर त्याला बेकन बटरमध्ये ग्रील्ड केले जाते

कुठे : सोडा बॉटल ओपनरवाला, कॅपिटल बिल्डिंग, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पू.)

वेळ : सकाळी ८३० ते रात्री १२


) हिडन पाव

हिडन पाव? नाव थोडं विचित्र वाटतं ना? पण असं नाव का बरं दिलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आतापर्यंत वडा हा पावात टाकून खाल्ला जात होता. पण आता याच्या अगदी उलटं झालं आहे. फर्जी कॅफेमध्ये वड्यामध्ये पाव टाकून खाल्ला जातो. बुचकळ्यात पडलात ना

फर्जी कॅफेमध्ये वडा पावला एक ट्विस्ट देण्यात आलं आहे. ट्विस्ट असं की पावाला बटाट्याचं कोटिंग देऊन तळलं जातं. म्हणजे वडापावच्या आत तुम्हाला पाव खाता येतो. एक प्रकारे वड्याच्या आत पाव दडलेला असतो. त्यामुळे याला वडा पाव बोलायचं की पाव वडा हे तुम्हीच ठरवा.

कुठे : फर्जी कॅफे, तळ मजला, कमला मिल्स, एस.बी. मार्ग, लोअर परेल

वेळ : दुपारी १२ ते रात्री १

किंमत अंदाजे २९५ 


) बाव वाव पाव

तुम्हाला वडापावसोबत येणारा पाव खायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी एक वेगळा पर्याय आहे तो म्हणजे पिटा पावचा. पिटा पाव हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. वडा हा पिटा पावमध्ये ठेवला जातो. त्यानंतर पावाच्या आतल्या बाजूस लसणीची चटणी त्यासोबत मेयो आणि मसाला फ्राईज ठेवून सर्व्ह केला जातो.


कुठे : सोशल ( सर्व आऊटलेट्समध्ये)

वेळ : सकाळी ९ ते रात्री १ 

किंमत १७० हून अधिक 


१०) चीज आणि मेओ वडापाव

तरुणमंडळी चीज आणि मियोनिझ सॉस पसंत करू लागले आहेत. त्यामुळे रुची मोरे यांनी पारंपरिक वडापावला चीजची जोड दिली आहे. या वड्यामध्ये स्वत: घरगुती पद्धतीनं बनवलेला अस्सल महाराष्ट्रीय ठेचा भाजीमध्ये मिसळवून कुरकुरीत वडा तयार केला जातो. पावाच्या आतील बाजूस घरगुती पद्धतीनं बनवलेला एक चटकदार सॉस लावून त्यात हा वडा ठेवला जातो.


त्यानंतर त्याच्यावर अगदी लहानांपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सर्वाना आवडणाऱ्या ‘चीज ’ या पदार्थाचा बारीक कीस करून अगदी भरीवपणे त्यावर टाकला जातो. त्यानंतर त्याच्यावर ‘मियोनिझ सॉस’ही टाकला जातो. त्यामुळे चीज आणि मियोनिझ यांची एकत्रितपणे आलेली चव खवय्यांना हवीहवीशी वाटणारी असते.

कुठे कॅफे सेल्फी, आग्रा रोडकल्याण (.)



हेही वाचा

गल्ली बेल्ली: कांदिवली खाऊ गल्ली

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी हे '५' उपाय उपयुक्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा