Coronavirus cases in Maharashtra: 557Mumbai: 306Pune: 59Thane: 29Islampur Sangli: 25Ahmednagar: 20Nagpur: 16Navi Mumbai: 16Pimpri Chinchwad: 15Kalyan-Dombivali: 10Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Ratnagiri: 2Kolhapur: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Usmanabad: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 21Total Discharged: 51BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी हे '५' उपाय उपयुक्त

न्नाच्या नासाडीत जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. हे धक्कादायक अाणि सुन्न करणारं वास्तव आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्या काही सोप्या टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी हे '५' उपाय उपयुक्त
SHARE

'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत जेवायला बसण्याची आपली संस्कृती आहे. पण आपला देश खरोखर अन्नाला पूर्णबह्म मानतो का? याबद्दलच साशंकता निर्माण व्हावी, अशी परिस्थिती आहे. कारण अन्नाच्या नासाडीत जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. हे धक्कादायक अाणि सुन्न करणारं वास्तव आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्या काही सोप्या टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

) खाण्याचं सामान खेरदी करायला जाताना आधी घरात काय आहे काय नाही याची तपासणी करावी. त्यानंतरच सामान खरेदी करावं. कधीकधी आपण विकत घेणाऱ्या भाज्या किंवा इतर सामान घरी असतं आणि पुन्हा ते आपण आणतो. या भाज्या ठेवायला फ्रिजमध्ये जागा अपुरे पडते. त्यामुळे बाहेर ठेवल्या जातात आणि कालांतरानं खराब होतात. यासाठी आवश्यक आणि मोजकेच सामान भरावे.

) स्वयपाक करताना आपण बऱ्याच भाज्यांच्या साली टाकून देतो. पण त्या सालींचा उपयोग देखील करता येऊ शकतो. अनेक जण बटाट्याची भाजी करताना सालं काढतात. पण सालासकट केलेली बटाट्याची भाजी देखील अप्रतिम होते. काकडीची देखील न सोलता केलेली कोशिंबीर खाण्याची लज्जत वाढवते. याशिवाय सँडव्हीच बनवताना ब्रेडच्या कडा कापल्या जातात. पण या कडांचा उपयोग करून ब्रेंडची भाजी किंवा शिरा बनवता येऊ शकतो.

) घरात स्वयपाक करताना बेताचा करावा. घरात कोण किती खाईल याचा अंदाज घ्या. कोण जेवणार नाही जेवणार हे देखील घरातल्या सदस्यांना विचारा. त्यानुसारच जेवण बनवा.

) अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण कित्येक दिवस तसेच पडून राहते. अखेर ते जेवण कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले जाते. अशावेळी शिळ्या उरलेल्या पदार्थांपासून काही वेगळा पदार्थ बनवता येऊ शकतो. उरलेल्या भाजी किंवा भातापासून थालीपीठ, कटलेट्स किंवा सँडवव्हीच बनवता येऊ शकतात.

) घरातल्यापेक्षा कार्यक्रमांमध्ये अधिक प्रमाणात अन्नाची नासाडी होते. एखाद्या चविष्ट पदार्थाच्या मोहापाई आपण जास्त वाढून घेतो. पण संपवता न आल्यानं ते टाकून दिलं जातं. त्यामुळे घर असो वा एखादा कार्यक्रम हवरेपणा कमीच करावा. खाण्याची जेवढी क्षमता आहे तेवढंच ताटात वाढून घ्यावं.हेही वाचा

गल्ली बेल्ली: मुलुंड खाऊ गल्ली

संबंधित विषय
संबंधित बातम्या