Advertisement

गल्ली बेल्ली: मुलुंड खाऊ गल्ली


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, मुलुंडमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...

मुलुंडमधील खाऊ गल्ली चीज वडापाव, सेजवान चीज फ्रॅन्की, दाबेली यांसारख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. कालीदासच्या समोरील चीज मसाला वडापाव, एमजी रोड येथील जलसा फ्रॅन्की कॉर्नरची पनीर चीज सेजवान फ्रॅन्की, द हन्ग्री पायरेट्सचा पिंक पास्ता, अंजार दाबेली, चॉकलेट पान.

हे पदार्थ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेलचं. तर नक्की या ठिकाणी जा आणि चमचमीत पदार्थांचा आनंद लुटा.


चीज मसाला वडापाव 

मसाला वडापाव

६० रुपये.

पत्ता: डॉ. आंबेडकर रोड, कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड प., मुंबई, महाराष्ट्र ४०००८०


जलसा फ्रॅन्की कॉर्नर 

पनीर चीज सेजवान फ्रॅन्की,

९० रुपये.

पत्ता: एम.जी. रोड, मुलुंड प., मुंबई, महाराष्ट्र ४०००८०


पिंक पास्ता 

द हन्ग्री पायरेट्स

१०० रुपये.

पत्ता: गणेश गावडे रोड, न्यू मातृछाया सोसायटी, मुलुंड प., मुंबई, महाराष्ट्र ४०००८०


कट्ची दाबेली

बाबुभाई पावानी दाबेली

१२ रुपये.

पत्ता: झावेर रोड, जैन मंदिर, मुलुंड प., मुंबई, महाराष्ट्र ४०००८०


काव्या लवली पान

चॉकलेट पान

४० रुपये.

पत्ता: मिश्रा हाऊस, विसावा समर्थ हॉटेल, एन. एस. रोड, मुलुंड प., मुंबई, महाराष्ट्र ४०००८०

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा