Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

पावसामुळे नॅशनल पार्कमधील कागदपत्रे गेली वाहून


पावसामुळे नॅशनल पार्कमधील कागदपत्रे गेली वाहून
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 29 ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसाचा फटका संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालाही बसला.

या पावसामुळे नॅशनल पार्कमध्ये सात फुटापर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या फाईली पाण्यात वाहून गेल्या. तर काही मातीत पडून खराब झाल्या. त्या फाईलींमध्ये असलेल्या महत्त्वाच्या नोंदणी जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांची सध्या धावपळ सुरू आहे.

29 ऑगस्टला पडलेल्या अतिवृष्टीमुळे बोरिवली येथे 104 चौ. कि. मी परिसरात वसलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तिथल्या आदिवासी पाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील कार्यालयात तुंबलेल्या पाण्यामध्ये कार्यालयातील शेकडो फाईली पाण्यात पडून खराब झाल्या. तर काही फाईलींसोबतच महत्त्वपूर्ण कागदपत्रेही पाण्यात वाहून गेली. इतकेच नाही तर त्या पावसामुळे कार्यालयातील फर्निचर आणि संगणक यांचे देखील नुकसान झाले आहे.

अनेक फाईली पाण्यात वाहून गेल्याने नोंदणी अहवाल पुन्हा तयार करण्यासाठी नॅशनल पार्क पुरातत्त्व विभागाकडून मदत घेण्याच्या विचारात आहे. सध्या नॅशनल पार्कचे 200 पेक्षा अधिक कर्मचारी तिथल्या स्थानिकांच्या मदतीने फाईली सुकवण्याच्या प्रयत्नात आहेत.


हेही वाचा - 

नॅशनल पार्कमध्ये 'राधा' बिबट्याचा मृत्यू

नॅशनल पार्कमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा