SHARE

मुंबई - दक्षिण मुंबईतील पुरातन वारसा स्थळांच्या निवडक पदपथांचा कायापालट होणार आहे. महापालिका मुख्यालयाजवळील दादाभाई नौरोजी मार्ग, हुतात्मा चौकाकडून सेंट थॉमस कॅथेड्रलकडे जाणारा मार्ग एशियाटिक सोसायटी आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पदपथांचा समावेश आहे. हे सर्व पदपथ हेरिटेज अनुरुप करत असून दिव्यांग व्यक्तींच्या गरजांचीही या वेळी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी ए विभागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिलेल्या आदेशांनुसार ही कामं हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
यामध्ये पदपथाच्या दोन्ही बाजूंना सौम्य उतार ठेवण्यात येणार असल्यानं व्हीलचेअरच्या सहाय्यानं जाणा-या व्यक्तींना या पदपथांचा वापर सोयीचं ठरेल. मात्र त्यांचा वापर वाहनांना करता येणार नाही.
याव्यतिरिक्त सीएसटीहून अंजुमन-ए-इस्लाम महाविद्यालयाकडे जाणारा महापालिकेचा पादचारी पूल आहे. या पुलावरील फरशा या हेरिटेज करण्यासोबतच पुलाची नवीन रंगरंगोटी देखील हेरिटेज अनुरुप करण्याचं प्रस्तावित असल्याचं दिघावकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या