Advertisement

शस्त्रांसह बोट सापडल्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबईत हाय अलर्ट

सुरक्षेच्या कारणास्तव किनारी भागांसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शस्त्रांसह बोट सापडल्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबईत हाय अलर्ट
संग्रहित फोटो
SHARES

रायगड समुद्रकिनारी सापडलेल्या एके 47 प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा झाली.

सुरक्षेच्या कारणास्तव किनारी भागांसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्व माहिती राज्य सरकारकडून केंद्रीय एजन्सींना देण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात हायअलर्ट जारी कऱण्यात आला आहे. तसेच इतर राज्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल रायगडला रवाना झाला आहेत.

रायगडमधील एका बोटीमध्ये शस्त्रासह साठा सापडल्यानंतर पुण्यात देखील हाय अलर्ट करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहेत. याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बोलावली तातडीची बैठक बोलवली आहे.

रत्नागिरीमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या लँडिंग पॉईंटवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हरिहरेश्वरच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते श्रीवंर्धनला रवाना झाले आहेत.

संजय मोहितेंसोबत विशेष पथकही रवाना झाले आहे. रायगडमध्ये आढळलेल्या बोटीची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक रवाना झाले आहे. रायगडसह सर्वच किनारी जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.हेही वाचा

रायगड: समुद्रकिनाऱ्यावर दहशतवादी बोट सापडली, बोटीत AK ४७ आणि गोळ्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा