Advertisement

मद्यपान करण्यात तेलंगना अव्वल, महाराष्ट्र आहे 'या' क्रमांकावर

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२०ची आकडेवारी समोर आली आहे.

मद्यपान करण्यात तेलंगना अव्वल, महाराष्ट्र आहे 'या' क्रमांकावर
SHARES

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२०ची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार तेलंगणा मद्यपान करण्याच्या बाबतीत गोव्यापेक्षा पुढे आहे. तर इशान्येकडील राज्य तंबाखूच्या सेवनात टॉपवर आहेत. या यादीत बिहारचं देखील नाव आहे. बिहारमध्ये दारूबंदी असली तरी बिहारमधील तळीरामांची संख्या अधिक आहे. 

सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील पुरुष दारू पिण्याच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक मद्यपान कर्नाटकमधील पुरुष करतात. दारूबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील सर्वात कमी पुरुष मद्यपान करतात. १५-४९ वयोगटातील लोकांचे २०१५-१६ च्या सर्वेक्षणात सर्वेक्षण केलं गेलं. तर १५ वर्षांवरील सर्व लोकांचा नवीन सर्वेक्षणात समावेश आहे.

ईशान्येकडील सिक्कीम राज्यातील महिला १६.२% आकडेवारीसह मद्यपान करण्यात अव्वल आहेत. तर आसाममधील ७.३% महिला मद्यपान करतात आणि हे राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे तेलंगणाचे पुरुष दारू पिण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर महिलाही मागे नाहीत, दारू पिण्यात त्यादेखील तिसर्‍या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणानुसार गोवा आणि तेलंगणा वगळता ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात.

शहरी महिलांपेक्षा खेड्यांमधील स्त्रिया तुलनेनं जास्त दारू पितात. हीच परिस्थिती देशातील बर्‍याच भागात आहे. गावातील स्त्रिया मद्यपान करते असं सांगण्यात अजिबात संकोच करत नाहीत. तर याबद्दल सांगताना शहरी महिला थोडासा संकोच करतात. शहरी आणि ग्रामीण पुरुष मद्यपान करतात, पण महिलांएवढे त्यांच्यात अंतर नाही.

तंबाखूचा वापर देशातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर खाल्ल्यामुळे त्यांना कर्करोग होईल अशी जाहिरात करूनही लोकांमध्ये प्रचंड व्यसन आहे. पूर्वीच्या सर्वेक्षणात असेही समोर आलं आहे की, लोक दारूपेक्षा जास्त तंबाखू खातात.

ईशान्येकडील मिझोरममध्ये ७७.८ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात तर ६५ टक्के स्त्रियांनाही तंबाखूचे व्यसन आहे. हे राज्य तंबाखूच्या वापराच्या बाबतीत आघाडीवर आहे. ईशान्य राज्यात महिला आणि पुरुषांमध्ये तंबाखूचा सर्वाधिक वापर आहे.

दक्षिणेकडील केरळ राज्यात सर्वात कमी तंबाखूचा वापर होतो. जेथे केवळ १७ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. १८ टक्के पुरुष गोव्यात तंबाखू खातात. महिलांच्या तंबाखू सेवनाच्या बाबतीत, हिमाचल प्रदेशात १.७ % तंबाखूचे सेवन केले जाते.हेही वाचा

कचरा वर्गीकरण न केल्यास ५ हजारांचा दंड, पनवेल महापालिकेची कारवाई

वाशी खाडीवरील नव्या उड्डाणपुलाला कोळी समाजाचा विरोध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा