Advertisement

मुंबईतल्या हाॅटेलचा प्रताप, २ अंडी, आॅम्लेटचं बिल ३४०० रुपये!

बॉलिवूड अभिनेता राहुल बोस याला एका नामांकित हॉटेलमध्ये २ केळ्याचं ४०० रुपये बिल आकारल्याची घटनाताजी असतानाच मुंबईतील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला २ उकडलेल्या अंड्यासाठी तब्बल १७०० रुपये मोजावे लागले आहेत.

मुंबईतल्या हाॅटेलचा प्रताप, २ अंडी, आॅम्लेटचं बिल ३४०० रुपये!
SHARES

बॉलिवूड अभिनेता राहुल बोस याला एका नामांकित हॉटेलमध्ये २ केळ्याचं ४०० रुपये बिल आकारल्याची घटनाताजी असतानाच मुंबईतील  एका हॉटेलमध्ये ग्राहकाला २ उकडलेल्या अंड्यासाठी तब्बल १७०० रुपये मोजावे लागले आहेत. कार्तिक धर असं या ग्राहकचं नाव असून, त्यानं मुंबईतील फोर सीजन्स हॉटेलमध्ये २ उकडलेल्या अंड्याची ऑर्डर दिली होती. त्यावेळी त्याला या अंड्यासाठी तब्बल १ हजार ७०० रुपये द्यावे लागले.

ट्विटरवरून माहिती

कार्तिक धर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली असून, त्यांनी उकडलेल्या २ अंड्यांसाठी मला १७०० रुपये द्यावे लागले असं लिहिलं आहे. तसंच, त्यांनी अभिनेता राहुल बोस याला टॅग करत 'भाई आंदोलन करे', असं लिहिलं आहे. कार्तिक धर हे 'ऑल द क्विन मेन' या चित्रपटाचे लेखक आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप हॉटेल मालकाच कोणतही उत्तर आलेलं नाही. तसंच, आॅम्लेटसाठी देखील त्यांच्याकडून तेवढीच रक्कम आकारण्यात आली.

२ केळ्यांसाठी ४०० रुपये

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. अभिनेता राहुल बोस यानं एका नामांकित हॉटेलमध्ये २ केळी मागवली होती. त्यावेळी त्याला या २ केळ्यांसाठी ४०० रुपये मोजावे लागले होते. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून त्या हॉटेलवर टीका केली होती.हेही वाचा -

मुंबईत नाही होणार दुधाची कमी- अर्जुन खोतकर

१६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार पुणे-मुंबई रेल्वे सेवाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा