Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

मुंबईकरांना खूशखबर! ५०० चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही

राज्य मंत्रिंमडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांना खूशखबर! ५०० चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही
SHARE

मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना यापुढे मालमत्ता कर भरावा लागणार नाही. राज्य मंत्रिंमडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.


महापालिकेत ठराव मंजूर

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव मुंबई महापालिकेने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला. परंतु हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे प्रलंबित होता. अखेर शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

यापूर्वी शिवसेना भाजप युतीच्या घोषणेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घरांना मालमत्ता करातून दिलासा देण्याचं आश्वासन दिलं होतं. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.


स्वयंपुनर्विकास धोरण मंजूर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वयंपुनर्विकास धोरणालाही मंजुरी देण्यात आली. तसंच प्रलंबित असलेले एसआरए प्रकल्प आता म्हाडाच्या ताब्यात देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून रखडलेल्या प्रकल्पातील कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून १० लाख रूपये देण्यात येणार आहेत.
हेही वाचा -

‘या’ दिवशी राहणार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बंद

Movie Review: लग्नाची बेडी अन् प्रेमाचा फियास्को
संबंधित विषय
ताज्या बातम्या