Advertisement

बेस्टच्या अडचणी वाढल्या


बेस्टच्या अडचणी वाढल्या
SHARES

मुंबई - बेस्ट उपक्रमाला 2016 पासून परिवहन तूट कर (टीडीएलआर) घेऊ नये, असे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिलेत. मात्र तरीही बेस्टनं परिवहन तूट कर ग्राहकांकडून 2016 मध्ये एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सहा महिने वसूल केलाय. त्यामुळे कर म्हणून वसूल करण्यात आलेली रक्कम बेस्ट उपक्रमाला ग्राहकांना परत द्यावी लागणार आहे. त्याकारणानं आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्टपुढे आता पुन्हा मोठे आर्थिक संकट उभे राहिलंय. बेस्टला सदर पैसे मार्च 2016 पर्यंत वसूल करण्याची परवानगी असताना त्यानंतरही कुठल्या आधारावर प्रशासनानं ही कर वसूली केली असे प्रश्न समिती सदस्य काँग्रेसचे रवी राजा आणि मनसेचे केदार होंबाळकर यानी सभेत विचारले.

बेस्टनं परिवहन तुटीच्या नावाने ग्राहकांकडून 3195 कोटी रुपये वसूल केले आहेत. हे सर्व पैसे ग्राहकांना परत करावे लागणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं बेस्टला परिवहन तूट कर वसुलीस मनाई केली असली तरी 'व्हिलिंग चार्ज' वीज वितरणाचा खर्च वसूल करण्यास परवानगी दिली आहे. भविष्यात टाटाला आपली व्यवस्था वापरण्यास देण्याची वेळ बेस्टवर आल्यास 'व्हिलिंग चार्ज'मुळे बेस्टला टाटाकडून वीज वितरण खर्च वसूल करता येणार आहे. मात्र महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं बेस्टला विज वितरण खर्चासाठी पर्याय दिला असला तरी बेस्टनं याआधी घेतलेले परिवहन तुटीचे पैसे ग्राहकांना कसे परत करणार ? असा प्रश्न आता बेस्ट समोर निर्माण झालाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा