दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली असून खरेदीच्या तयारीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या दिवाळीपूर्वी (diwali) म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र (maharashtra) गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (mhada) कर्मचाऱ्यांना यंदा 25 हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, म्हाडा कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये 23 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. यावर्षी दिवाळी बोनस (bonus) वाढवावा, अशी मागणी म्हाडा कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची होती.
यंदा 30 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी म्हाडा कर्मचारी अधिकाऱ्यांकडून म्हाडा प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. यासंबंधीचे पत्रही म्हाडा प्राधिकरणास देण्यात आले होते.
दिवाळी बोनसचा प्रस्ताव गुरुवारच्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. यावेळी या प्रस्तावावर चर्चा झाली आणि शेवटी 25 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बोनसच्या रकमेत मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आल्याने कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई (mumbai) महानगरपालिकेतील (brihanmumbai municipal corporation) कर्मचाऱ्यांनाही यंदा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. यंदा बोनसची रक्कम गेल्या वर्षीच्या तुलने 500 ते 1 हजार रुपयाने वाढवली जाण्याची शक्यता आहे.
मात्र कामगार संघटनेने तब्बल 20 टक्के म्हणजेच 66 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे, परंतू ही मागणी मान्य होणे शक्य नाही. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा बोनसची रक्कम वाढवली जाणार असल्याचे समोर येत आहे.
गेल्या वर्षी दिवाळीला महापालिका (bmc) कर्मचार्यांना 29 हजार रुपये बोनस मिळाला होता. यंदा यात 500 ते 1 हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा