Advertisement

मंत्रालय झाले कॉर्पोरेट, गळ्यात दिसणार एन्ट्री पास!


मंत्रालय झाले कॉर्पोरेट, गळ्यात दिसणार एन्ट्री पास!
SHARES

तुम्ही कॉर्पोरेट वा इतर कंपनीचे कर्मचारी असाल, तर साहजिकच तुम्हाला गळ्यात आयडी अर्थात ओळखपत्र घालावेच लागत असेल. पण सरकारी कर्मचारी किंवा सरकारी कामासाठी नागरिकांच्या गळ्यात आयडी दिसले तर?

आता मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या गळ्यात आयडी दिसणार आहे. सुरक्षेच्या दुष्टीकोनातून मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात जाताना गेटवर पास घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. आधी तसा नुसता पास मिळायचा. पण आता हा पास तुम्हाला गळ्यात घालून जावं लागेल. याचसोबत बाहेर येताना तुम्हाला हे आयडी कार्ड परत देऊन जावं लागणार आहे.



मंत्रालयात रोज येतात हजारो लोक

मंत्रालयात रोज 3 ते 4 हजार लोक विविध कामांसाठी येत असतात. त्यातच मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते. तेव्हा मंगळवारी आणि बुधवारी मंत्रालयात येणाऱ्या लोकांची संख्या 6 हजारच्या आसपास पोहोचते. काही जण काम पूर्ण झाल्यानंतरही मंत्रालयात खूप वेळ थांबतात. हे लोक अधिकारी आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना भेटतात. त्यामुळे विनाकारण कामात व्यत्यय येतो. त्यामुळे ज्या विभागात तुमचे काम आहे, त्या विभागाचे नाव या पासवर टाकण्यात आल्याची माहिती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


याचे फायदे काय?

बाहेरचा व्यक्ती आणि मंत्रालयातील कर्मचारी कोण? हे ओळखण्यास यामुळे सोपे होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. या पासवर फोटो आणि बारकोड आहे. त्यामुळे लोकांना आपली सगळी माहिती द्यावी लागणार आहे. यामुळे पुन्हा जेव्हा मंत्रालयात याल, तेव्हा तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर सांगावा लागेल.



हेही वाचा -

एमटीएनएलने टाकली मान, मंत्रालयात खासगी कंपन्यांची शान!

मंत्रालयात 'बाटली बंद', सुरक्षा रक्षकांना कशाची चिंता? वाचा..


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा