झाडे हवीत, तर जंगलात जा!

 Fort
झाडे हवीत, तर जंगलात जा!
Fort, Mumbai  -  

'झाडे कापली नाहीत, तर मेट्रो 3 कशी होणार ? ट्रेनमुळे होणारे अपघात कसे रोखणार ?' असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी झालेल्या सुनावणीत 'झाडे हवी असतील, तर जंगलात जा', असे सुनावले. येत्या एक ते दोन दिवसांत या याचिकेवर अंतिम निर्णय येणे अपेक्षित आहे.

मेट्रो 3 प्रकल्पादरम्यान होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला विरोध करत पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आहे. सद्यस्थितीत न्यायालयाने झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली असल्याने मागच्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम अनेक ठिकाणी बंद आहे. परिणामी प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर होत असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधत बुधवारी 'एमएमआरसी'ने स्थगिती उठवण्याची मागणी केली. त्यानुसार उच्च न्यायालयाने मेट्रो महत्त्वाची असल्याचे म्हणत याचिकाकर्त्यांना फटकारले. या याचिकेवर एक ते दोन दिवसांत निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार-
उच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला तर, आम्ही नक्कीच सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी माहिती याचिकाकर्ते झोरू बाथेना यांनी दिली आहे.

Loading Comments