Advertisement

मालाडमध्ये विकासकाच्या फायद्यासाठी उद्यानातून रस्ता?


मालाडमध्ये विकासकाच्या फायद्यासाठी उद्यानातून रस्ता?
SHARES

मालाड पूर्वेकडे सीओडीजवळील सीटीएस क्र 168 वर एक आरक्षित उद्यान आहे. या उद्यानाच्या जागेत कुठलाही रस्ता आरक्षित नाही. विकास आराखड्यात तसे स्पष्टपणे नमूद असून संबंधित जागा हिरव्या रंगाने दर्शविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानातून एका खासगी विकासकाच्या फायद्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी बेकायदा रस्ता उभारल्याचे पुढे आले आहे.

महापालिकेच्या पी/उत्तर विभागाकडून यासंदर्भात माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविण्यात आली होती. त्याला उत्तर देताना विभाग कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, या उद्यानात कुठलाही बेकायदा रस्ता नाही.

परंतु पी/उत्तर विभागाच्या देखभाल विभागात कार्यरत अभियंता अमित जाधव यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी या उद्यानात दोन विभागांना जोडणारा एक रोड असून तो महापालिकेच्या उद्यान विभागाच्या खर्चाने बनविण्यात आल्याचे सांगितले.

त्यामुळे सीटीएस क्र 168 वरील आरक्षित उद्यानातून एखादा रस्ता जात असेल, तर माहिती अधिकार कायद्यांतर्गत उत्तर देताना तेथे रस्ता नसल्याचे का नमूद करण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्यानाला लागूनच एक अधिकृत रस्ता आहे. या रस्त्याची डागडुजी गरजेची असताना एका खासगी विकासकाच्या इशाऱ्यावर महापालिका अधिकाऱ्यांनी उद्यानातील जागेत बेकायदा रस्ता उभारुन पालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा