Advertisement

मुसळधार पावसाचा मुंबईला होणाऱ्या दुग्ध पुरवठ्याला फटका

मुंबईला दररोज एकूण ४४ लाख लिटर दुधाची आवश्यकता असते, त्यामध्ये ६ लाख दूध कमी येत आहे.

मुसळधार पावसाचा मुंबईला होणाऱ्या दुग्ध पुरवठ्याला फटका
SHARES

मुंबईसह राज्यभरात मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं राज्यातील अनेक रस्ते हे जलमय झाले असून, सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं. शिवाय याचा फटका मुंबईला होणाऱ्या दुग्ध पुरवठ्यावर बसला आहे. मुंबईला दररोज एकूण ४४ लाख लिटर दुधाची आवश्यकता असते, त्यामध्ये ६ लाख दूध कमी येत आहे.

सध्या सांगली, कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबईला होणाऱ्या दुग्ध पुरवठ्यावर झाला आहे. पावसामुळं अनेक गावांमध्ये पाणी साचल्यानं दूध संकलनात तसंच, दुधाची वाहतूक करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळं अनेक ठिकाणी दूध वितरण करणाऱ्या गाड्या उशिरा पोहोचत आहेत. रात्री साधारण २ ते ३ वाजता मुंबईत पोहोचणाऱ्या दुधाच्या गाड्या सकाळी ५-६ वाजता पोहोचत आहेत. यामुळं दूध वितरणाचे वेळेचे पुढील गणित कोलमडले आहे.

दूध वितरण करणारे कर्मचारी ठराविक वेळेतच दूध वितरण करतात. दूध उशिरा पोहोचत असल्याने घरोघरी दूध पोहोचवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याची माहिती समोर येत आहे.

भाजीपाल्यावर परिणाम

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत झालेली अतिवृष्टी आणि ओढवलेल्या पूरस्थितीमुळं शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी मुंबईत येणाऱ्या भाज्यांची आवक जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी घटली असून आवक घटल्याने प्रतिकिलोमागे १० ते १५ रुपयांची दरवाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळं कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ओढवलेल्या पूरस्थितीनं लोकांचे होते नव्हे सगळे हिरावून नेलं. मुंबईत नाशिकच्या जवळपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येतो. त्याचप्रमाणे ठाणे, पालघर येथील शेतकरीही मुंबईत भाजी आणतात. मात्र या सर्वच भागांत झालेल्या अतिमुसळधार पावसाने मुंबईला होणारा भाजीपुरवठा सध्या घटला आहे.

मागणीच्या तुलनेत पुरवठा बराच कमी असल्याने दर वाढले आहेत. शिवाय हाताशी आलेले पीकच नष्ट झाल्याने नवे पीक हाताशी येईपर्यंत आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात आणखी तुटवडा भासण्याची आणि दर अधिक वाढतील असा अंदाज घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.



हेही वाचा - 

२ ऑगस्टपासून सुरू होणार अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचं लसीकरण

महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा