Advertisement

२ महिन्यांत २८ लाख परप्रांतीय मुंबईत परत

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, आता या पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय पुन्हा एकदा मुंबईत दाखल होत आहेत. फेब्रुवारीमध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतले होते.

२ महिन्यांत २८ लाख परप्रांतीय मुंबईत परत
SHARES

मुंबईतील कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असून, आता या पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय पुन्हा एकदा मुंबईत दाखल होत आहेत. फेब्रुवारीमध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतले होते. मात्र, मे आणि जून या दोन महिन्यांत मुंबई महानगरात आलेल्या मेल, एक्स्प्रेसमधून २८ लाख प्रवासी दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक प्रवासी मध्य रेल्वेवरून दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

फेब्रुवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मार्चच्या अखेरीपासून राज्य सरकारने मुंबईसह राज्यभर निर्बंध लागू केले. त्यामुळे धास्तावलेले कामगार आपल्या कुटुंबांसह आपापल्या गावी रवाना झाले. परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेने विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या. लॉकडाऊन शिथिल होताच बिघडलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्याची चिन्हे दिसताच परराज्यात गेलेले मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागले आहेत.

मार्च व एप्रिल महिन्यात परराज्यातून मुंबई महानगरात येणाऱ्यांची संख्या कमी होती. परंतु मे महिन्यापासून या संख्येत हळूहळू वाढ झाल्याचं समजतं. परराज्याबरोबरच महाराष्ट्रातल्या विविध विभागातूनही प्रवासी येत होते. परंतु त्याचे प्रमाण फारच कमी असल्याचेही समजतं. मध्य रेल्वेवर (central railway) दर दिवशी सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथे उत्तरेकडून व दक्षिणेकडून गाड्या येतात. दरभंगा, वाराणसी, गोवा, उत्तराखंड, केरळ, भुवनेश्वार, हैदराबाद, बंगळूरु तर पश्चिम रेल्वेवरील (Western railway) जोधपूर, अमृतसर, गुजरात, नवी दिल्ली, गोरखपूर, मुझफ्फरपूर इत्यादी विभागातून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसपर्यंत गाड्या दाखल होतात.

मे व जून या २ महिन्यात पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमधून मुंबई महानगरात एकूण ७ लाख ८ हजार ९५६ जण, तर मध्य रेल्वेच्या गाड्यांमधून परराज्यातून महाराष्ट्रात २८ लाख २६ हजार २२६ जण दाखल झाले आहेत. यात मुंबई विभागात सुमारे २१ लाख प्रवासी आले आहेत. मे महिन्यात पश्चिम रेल्वेवर मुंबई विभागात दर दिवशी १५ हजार १०२ प्रवासी आणि जून महिन्यात २४ हजार प्रवासी येत होते.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड या संवेदनशील भागातून महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. हा निर्णय १७ एप्रिल २०२१ला घेण्यात आला. त्यानंतर १ मे ला उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालही या संवेदनशील भागाच्या यादीत आले.

या संवेदनशील भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या वेळेपासून ४८ तासांमध्ये कोरोना चाचणी बंधनकारक केली. संशयित प्रवाशांची आरटीपीसीआर किं वा अ‍ँटीजन चाचणी करण्यात येते. तरीही मोठ्या संख्येने प्रवासी येतच राहिले. संशयित प्रवाशांची आरटीपीसीआर किं वा अ‍ँटीजन करण्यात येते. याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांचेही थर्मल स्क्रिनिंग होते.




हेही वाचा -

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा