मुंबईमध्ये झिरो शॅडो दिवस, मंगळवारी ठाण्यात असणार झिरो शॅडो दिवस

Mumbai
मुंबईमध्ये झिरो शॅडो दिवस, मंगळवारी ठाण्यात असणार झिरो शॅडो दिवस
मुंबईमध्ये झिरो शॅडो दिवस, मंगळवारी ठाण्यात असणार झिरो शॅडो दिवस
See all
मुंबई  -  

मुंबईकरांनी सोमवारी झिरो शॅडो म्हणजेच शून्य सावली दिवस अनुभवला. सावली बाजूला न पडता फक्त पायाखाली पडते या प्रकारालाच वैज्ञानिक भाषेत झिरो शॅडो डे म्हणतात. सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर आल्याने सावली पायाखाली येते त्यामुळे सावली दिसेनाशी झाली. सोमवारी 12 वाजून 35 मिनिटांनी सर्व मुंबईकरांनी झिरो शॅडो दिवस अनुभवला. वर्षांतून दोन वेळा अशा प्रकारची स्थिती असते.

मुंबई उत्तर अक्षांशात आहे, सूर्य सोमवारी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी 19 उत्तर अक्षांशावर आला होता. त्यामुळे अशा प्रकारची स्थिती तयार झाली.
- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

अशावेळी घराच्या बाहेर पडू नये असा लोकांचा गैरसमज असतो. मात्र अशा अंधविश्वासाला बळी न पडता यामागील शास्त्रीय कारण समजून घेत आपले खगोल शास्त्रीय ज्ञान वाढवण्याची गरज आहे, असंही सोमण म्हणाले. मंगळवारी ठाणे, कल्याण, डोंबिवलीत झिरो शॅडो दिवस असणार आहे.

[हे पण वाचा -  15 मे ला सावली होणार गायब !]

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.