Advertisement

दहिसरमध्ये क्षयरोग चिकित्सा केंद्राचे उदघाटन

शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या नगरसेवक निधीतून दहिसर मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

दहिसरमध्ये क्षयरोग चिकित्सा केंद्राचे उदघाटन
SHARES

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दहिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये क्षयरोग चिकित्सा केंद्राचं उदघाटन झालं. शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. प्रभाग १च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या नगरसेवक निधीतून दहिसर मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

क्षयरोगाबद्दल अजूनही नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. नागरिकांनी वेळीच उपचार केल्यास हा रोग बरा होत असल्याचं घोसाळकर यांनी सांगितल. तसंच ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात या रोगावर मोफत उपचार केले जातात.

वर्षभर एका रुग्णाला औषधे देण्यासाठी पालिका प्रशासन १२ लाख रुपये खर्च करते. देशभरात केवळ मुंबई महानगरपालिका हे करत असल्याचं घोसाळकर यांनी अभिमानानं सांगितलं.

याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, संध्या नांदेडकर सहाय्यक आयुक्त मनपा, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेवक मुंब्रा बँक संचालक अभिषेक घोसाळकर, अविनाश वायदंडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, रंजीता बागवे जिल्हा क्षयरोग अधिकारी सहित कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा

मॉल, उद्याने, बाजारांसाठी नवी मुंबई पालिकेची नवीन नि‍यमावली

कोविडशिल्डचा दुसरा डोस ४५ दिवसांनी, नागरिकांची केंद्रावर गर्दी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा