Advertisement

coronavirus updates: पर्यटनावर कोरोनाचं सावट

विदेशीच नव्हे तर देशी पर्यटकांचीही संख्या घटली

coronavirus updates: पर्यटनावर कोरोनाचं सावट
SHARES

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणार्‍या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. आजवर कधी नव्हे एवढी येथील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. विदेशीच नव्हे तर देशी पर्यटकांचीही संख्या घटली आहे. १ मार्च २0१९ ते १0 मार्च २0१९ या एक महिना ८ दिवसांच्या कालावधीत अजिंठा लेणीला भेट देणार्‍या विदेशी पर्यटकांची संख्या ४२१८ इतकी होती. तीच संख्या या वर्षी (२0२0) याच कालावधीत हजाराने घटली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनाचा प्रकोप वाढल्यापासून चीनचा एकही पर्यटक या दोन्ही लेण्यांमध्ये नजरेस पडला नसल्याचे लेणीत कार्यरत कर्मचार्‍यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना रुग्णांची भारतातील वाढती संख्या पाहता पुढील काळात विदेशी पर्यटकांची संख्या आणखी घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हेही वाचाः-CoronaVirus: कोरोनाचा फटका आता आंबा निर्यातीवरही

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे नेहमीच गजबजून दिसणार्‍या अजिंठा आणि वेरूळ लेणीमध्ये प्रथमच पर्यटकांची संख्या रोडावली आहे. कोरोनाच्या भीतीने विदेशी पर्यटकच नव्हे तर देशी पर्यटकही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. त्यामुळे या पर्यटनस्थळांवर व्यवसाय थाटून असलेल्या व्यवसायांनाही मोठा फटक बसत आहे. मागील वर्षी म्हणजे २0१९ मध्ये १ फेब्रुवारी ते १0 मार्च या कालावधीत अजिंठा लेणीला २५ हजार ३८६ भारतीय व ४ हजार २१८ विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. या वर्षी १ फेब्रुवारी ते १0 मार्चपयर्ंत २९ हजार १२७ भारतीय तर ३ हजार २0२ विदेशी पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली आहे. गतवर्षीची पर्यटकांची आकडेवारी पाहता सुमारे एकाच महिन्यात सुमारे हजार विदेशी पर्यटक घटल्याचे स्पष्ट होते. हे पर्यटक लेणी पाहण्यासाठी आले तर फदार्पूरमध्ये मुक्कामाला थांबतात. आता मुक्कामाला थांबणार्‍या पर्यटकांतही घट झाली आहे.

हेही वाचाः- राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले

मागील वर्षी फदार्पूर हॉलिडे रिसॉर्टमध्ये फेब्रुवारी महिन्यात ११६ विदेशी पर्यटक थांबले होते व मार्च २0१९ मध्ये २१ विदेशी पर्यटक थांबले होते. तर या वर्षी ८0 विदेशी पर्यटक थांबले होते. तर गेल्या दहा दिवसांत एकही विदेशी पर्यटक मुक्कामी थांबलेला नाही. टी पॉइंट गेस्ट हाउसला २0१९ च्या फेब्रुवारी महिन्यात १0 विदेशी पर्यटक थांबले होते. मार्चमध्ये १ तर फेब्रुवारी २0२0 मध्ये केवळ ४ विदेशी पर्यटक थांबले होते. तर गेल्या १0 दिवसांत एकही पर्यटक थांबला नाही. यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. जे विदेशी पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले त्यातील बहुतांश एक महिना आधीच येऊन गेले आहेत. नवीन येणार्‍या पर्यटकांचे ग्रुप मोठ्या प्रमाणात कॅन्सल होत असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा