Advertisement

कोरोनामुळं राज्यात पेट्रोल विक्रीत ८० टक्के घट

कर्फ्यूमंळे मुंबईत पेट्रोलचा वापर ८० टक्क्यांनी घटला आहे.

कोरोनामुळं राज्यात पेट्रोल विक्रीत ८० टक्के घट
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात २१ दिवसांच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासह मुख्यमंत्र्यांनी लोकांना आवश्यकतेनुसार, घराबाहेर पडण्याचे आवाहन केलं आहे. या घोषणानंतर राज्यात पेट्रोल वापरामध्ये लक्षणीय घट झाली आहे.

कर्फ्यू जाहीर झाल्यानंतर राज्यात पेट्रोल विक्रीत ८० टक्के घट झाली आहे. तसंच, केवळ पेट्रोल पंपांच्या अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल देण्यात येत आहे. कर्फ्यूमंळे मुंबईत पेट्रोलचा वापर ८० टक्क्यांनी घटला आहे. यासह डिझेलचा वापरही कमी झाला आहे. पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठा करण्यासाठी दिवसाला केवळ १२ तास पेट्रोल पंप उघडलं जात आहेत. 

कर्फ्यूमुळं रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी होत असून, केवळ तेलाच्या विक्रीत २० टक्के घट झाली आहे. मुंबईत एकूण २४३ पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी २२३ पंप डीलर आहेत तर २० पंप कंपनीचे आहेत. इतर उद्योगांप्रमाणेच कोरोना विषाणूनंही पेट्रोल पंप मालकांना बंद केले आहे. कर्फ्यूमुळे सकाळी व संध्याकाळी या वेळेत केवळ महानगरात इंधन विकले जात आहे. 



हेही वाचा -

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा