Advertisement

कोरोनापेक्षा गुगलवर आयपीएल सर्वाधिक सर्च!

गुगल इंडियानं बुधवारी २०२० मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शब्दांची एक यादी जारी केली.

कोरोनापेक्षा गुगलवर आयपीएल सर्वाधिक सर्च!
SHARES

गुगल इंडियानं बुधवारी २०२० मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शब्दांची एक यादी जारी केली. विशेष म्हणजे कोरोनापेक्षाही लोकांनी आयपीएलला सर्वाधिक सर्च केलं. म्हणजेच ओव्हरऑल सर्चिंगमध्ये आयपीएल पहिल्या आणि कोरोना दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटींत आगामी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी सर्वाधिक सर्च करण्यात आले. इतकेच नव्हे तर लोकांनी अमेरिका, बिहार आणि दिल्ली निवडणुकीबाबतही मोठ्या प्रमाणात सर्च केलं.

पीएम किसान योजना आणि चित्रपटांत ‘दिल बेचारा’ सर्वाधिक सर्च झाले. गुगल ग्लाेबल डेटानुसार, जगात सर्वाधिक सर्च कोरोनाबाबतच करण्यात आले. लोकांनी घरातच पनीर तयार करण्याची पद्धत आणि जवळपासच्या फूड शेल्टर्सना इतके सर्च केले की ते टॉप लिस्टमध्ये समाविष्ट झाले.

भारतात लोकांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक, लॉकडाऊन, टोळधाड, बैरूत धमाका, ऑस्ट्रेलियातील वणव्याबाबत सर्वाधिक सर्च केले. सर्वाधिक सर्च होणाऱ्यांत कनिका कपूर ही बॉलीवूड गायिका तिसऱ्या स्थानी होती. अमिताभ बच्चन, कंगना रणौत, रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडेलाही सर्च करण्यात आलं.

चित्रपटांच्या सर्च लिस्टमध्ये सुशांतसिंह राजपूतचं नाव नाही. त्याचा ओटीटीवरील ‘दिल बेचारा’ चित्रपट सर्वाधिक सर्च झाला. यानंतर तामिळ अॅक्शनपट ‘सोरारई पोटरू’ सर्च झाला. बॉलीवूड बायोपिकमध्ये तान्हाजी, गुंजन सक्सेना, शकुंतला देवी सर्च झाली.

वेब सिरीज सर्चमध्ये मनी हाइस्टनंतर स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी, मिर्झापूर-२ आणि बिग बॉस-१४ चा समावेश आहे. शब्दार्थांसाठी सीएए, एनआरसी आणि नेपोटिझमलाही सर्वाधिक सर्च करण्यात आले.

गुगलनुसार सर्वाधिक रंजक सर्च टर्म हाऊ टू, व्हाॅट इज आणि निअर मी हे आहेत. गुगलनं म्हटलं, या सर्च क्वेरी सांगतात की लोक कोरोनाकाळात हे सर्व सर्च करत आहेत. उदा. हाऊ टू मेक पनीर, हाऊ टू इन्क्रीज इम्युनिटी, हाऊ टू मेक डालगोना कॉफी सर्वाधिक सर्च झाले.



हेही वाचा

मुंबईत नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक मालमत्तांची नोंदणी

नोव्हेबर महिन्यात जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणात घट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा