या मैदानाचं करायचं काय?

 Dadar
या मैदानाचं करायचं काय?
या मैदानाचं करायचं काय?
See all

दादर म्हणजे उच्चभ्रू लोकांची वस्ती. सुंदर, सुशोभित परिसर असे एक चित्र सहज डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र दादरच्या गोखले रोडवर महापालिका शाळेच्या बाजूला असलेल्या जाखादेवी हॉस्पिटल कम्पाऊंडची दुरवस्था झालेली दिसून येत आहे.


या ठिकाणी येत्या 2-3 वर्षांच्या काळात लोकांच्या सुविधेसाठी महापालिकेचे मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिक करण्यात येणार आहे 

- रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग

गेल्या अनेक महिन्यांपासून पडून असलेल्या या मैदानाच्या गेटला धड कुलूपही लावलेले नाही. परिसरात दत्ता राऊळ मैदान सोडता मुलांना खेळायला जागाच नाही. मात्र विकासाच्या नावावर अनेक दिवसांत हे कम्पाउंड दुरवस्थेत आहे. तसेच हॉस्पिटलचे कम्पाउंड असल्यामुळे मुले खेळूही शकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी किमान महापालिकेच्या कृपेने हॉस्पिटल तरी बांधण्यात यावे अशी स्थानिकांची इच्छा आहे. सदर कंपाऊंडच्या भिंतीचे बांधकाम माजी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या कार्यकाळात 2013- 2014 ला करण्यात आले होते. मात्र तेव्हापासून सदर कम्पाऊंड विकासाच्या नावावर अर्धवट अवस्थेत आहे.

Loading Comments