Advertisement

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला पालिकेत नोकरी

पालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस कोरोनाशी लढा देत आहेत. यामुळे अनेक डाॅक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी यांना कोरोनाची लागणही होत आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला पालिकेत नोकरी
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. पालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस कोरोनाशी लढा देत आहेत. यामुळे अनेक डाॅक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी यांना कोरोनाची लागणही होत आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिकेत नोकरी देण्यात येणार आहे. पालिकेच्या कामगार विभागाने नुकतंच याबाबतचं परिपत्रक काढलं आहे.  

 परिपत्रकानुसार, कामावर असताना कोरोनाची बाधा होऊन एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार वारसांना नोकरी मिळणार आहे. रुग्णालयात काम करण्यापासून ते सफाई कामगार, अन्नवाटप करणारे कर्मचारी तसंच पालिकेची दैनंदिन कामे पार पडणारे कर्मचारी नागरिकांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी राबत आहेत.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत कोरोना झालेल्या पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 



हेही वाचा -

मुंबईत रात्री 'या' वेळेत घराबाहेर पडण्यावर निर्बंध

रेशनचं धान्य घेताना आता ‘अंगठा’ लावण्याची गरज नाही!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा