Advertisement

न्यायमूर्ती एस. ए. बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती बोबडे हे रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याबरोबरच न्यायमूर्ती बोबडे यांनी अनेक महत्त्वाचे खटलेही हाताळले आहेत.

न्यायमूर्ती एस. ए. बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश
SHARES

 न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. ते १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. सरन्यायाधीशपदावर नियुक्ती होणारे शरद बोबडे हे दुसरे मराठी व्यक्ती आहेत. या आधी  न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड मराठमोठे व्यक्ती सरन्यायाधीश होते. 

विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती बोबडे हे रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याबरोबरच न्यायमूर्ती बोबडे यांनी अनेक महत्त्वाचे खटलेही हाताळले आहेत. न्या. बोबडे हे महाराष्ट्रातील नागपूरचे आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते न्यायमूर्तीही होते. न्या. बोबडे यांनी अनेक  महत्वाच्या खटल्यांचे कामकाज पाहिलं आहे. त्यांचा रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या घटनापीठात समावेश आहे. 

सुप्रीम कोर्टानं आधार कार्डसंबंधी खटल्यात जो आदेश दिला होता, त्या खंडपीठात न्या. बोबडे यांचा समावेश होता. न्या. बोबडे यांनी नागपूर विद्यापीठातून बी.ए. आणि एलएलबी शिक्षण घेतलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली केली. २००० साली त्यांनी हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते न्यायमूर्ती झाले. २०१३मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाली. 


हेही वाचा -

विराट कोहली दहशतवाद्यांच्या रडारवर

उद्योगपती राज कुंद्राची ईडी करणार चौकशी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा