Advertisement

'केडीएमसी'च्या कंत्राटी सफाई कामगारांचा संप स्थगित

सफाई कामगरांनी संध्याकाळपर्यंत पगार न झाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'केडीएमसी'च्या कंत्राटी सफाई कामगारांचा संप स्थगित
SHARES

कल्याण-डोंबिवली परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापलिके (केडीएमसी)ने कंत्राट दिलं आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने या कामगारांचे पगार थकवल्याने 'केडीएमसी'च्या डोंबिवलीतील सफाई कामगारांनी बुधवारी सकाळपासून आंदोलन सुरू केलं. अखेर संध्याकाळपर्यंत कामगारांचे पगार देण्याचं आश्वासन 'केडीएमसी'चे आयुक्त पी. वेलारासू यांनी दिल्याने कामगारांनी हा संप स्थगित केला.


तर, बेमुदत संप

मात्र, संप मागे घेतानाच कामगरांनी संध्याकाळपर्यंत पगार न झाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


३ महिन्यांचा पगार रखडला

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ४०० सफाई कामगार शहरातील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकण्याचं काम करतात. या कामगारांपैकी १२० चालक आहेत, तर २८० कामगार आहेत. या कामगारांना गेल्या ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी पगाराविना घर कसं चालवायचं? असा प्रश्न या कामगारांना पडला आहे.


आयुक्तांची भेट

या प्रकरणाबाबत कामगारांनी केडीएमसी आयुक्त, प्रशासन यांच्याकडे अनेकदा चकरा मारूनही काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळं कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. कामगारांनी संप पुकारताच आयुक्तांनी त्यांची भेट घेत संध्याकाळपर्यंत पगार देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.हेही वाचा-

महापालिका शाळांत कुपोषणमुक्तीचा फाॅर्म्युला कुठला? 'प्रजा'चा महापालिकेला सवाल

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर दूध भेसळखोरांवर कारवाई, ९ लाख लिटर दुधाची तपासणीRead this story in हिंदी
संबंधित विषय