Advertisement

सत्यशोधन समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यास तयार, विरोधी पक्षनेत्यांनी आव्हान स्वीकारलं


सत्यशोधन समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यास तयार, विरोधी पक्षनेत्यांनी आव्हान स्वीकारलं
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेलवरील कारवाईसंदर्भात अधिकाऱ्यांचे निलंबन करताना एका राजकीय नेत्यांने कारवाई न करण्यासाठी दबाव आल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला. मात्र, हे सांगतानाच त्यांनी ‘त्या’ राजकीय नेत्याचं नाव सांगितलं नाही. ते नाव विरोधी पक्षनेत्यांनी शोधावं असं सांगत एकच खळबळ उडवून दिली. मात्र, आयुक्तांनी सोपवलेली ही जबाबदारी स्वीकारण्यास विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तयारी दर्शवली आहे. या दबाव टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव आपल्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती शोधून काढेल, परंतु यासाठी आयुक्तांनी पूर्णपणे सहकार्य करावं, असंही राजा यांनी म्हटलं आहे.


ती व्यक्ती कोण?

कमला मिलमधील मोजोस आणि वन अबाेव्ह या पबमधील आगीसंदर्भात महापालिका सभागृहात चर्चा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांवर या कारवाईत दबाव टाकणारी ती व्यक्ती कोण? असा सवाल आयुक्तांना विचारला होता. त्यावर आयुक्तांनी, कमला मिलमधील आगीनंतर ६ अधिकाऱ्यांना निलंबित केलं. हे निलंबन केलं जात असताना एका राजकीय नेत्याने अशी कशी कारवाई केली, अशी विचारणा केली. परंतु त्या नेत्याच्या हॉटेलसह १७ हॉटेल, पबमध्येही कारवाई करण्यात आली. त्या राजकीय नेत्याचे नाव मी सांगणार नाही. ते नाव विरोधी पक्षनेत्याने शोधावं, असं सांगितलं.


'आयुक्त माझे बॉस नाही'

महापालिका आयुक्तांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावर स्पष्टीकरण देताना महापालिका आयुक्त माझे काही बॉस नाही, नाही मी त्यांच्यासारखा नोकरदार आहे. माझे बॉस हे महापौर आहेत. त्यामुळे मला ते अशाप्रकारच्या सूचना करू शकत नाही. परंतु या दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याचं नाव मी शोधावं, अशी इच्छा असेल तर मी त्यासाठी तयार आहे.

या दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याच्या नाव शोधण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली जर सत्यशोधन समिती तयार करण्याची आयुक्तांची इच्छा असेल तर त्यांनी महापौरांच्या माध्यमातून त्यांनी माझे नाव जाहीर करावं. त्याप्रमाणे मी याची चौकशी करेन. परंतु ही चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी मला पूर्ण सहकार्य करावं. २९ ते ३१ जानेवारी दरम्यान आयुक्तांना कुणा कुणाचे फोन आले होते, त्या फोन कॉल्सची विस्तृती माहिती त्यांनी मला उपलब्ध करून द्यावी. याशिवाय या कालावधीत कोण कोण आयुक्तांना भेटायला आलं होतं, याचीही माहिती उपलब्ध करून द्यावी, असं रवी राजा यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा-

मुंबईतील बेकायदा बांधकामे बेधडक तोडा, शिवसेना आयुक्तांच्या पाठिशी- उद्धव ठाकरे

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा