Advertisement

दबाव टाकणाऱ्या 'त्या' नेत्याचं नाव जाहीर करा, नाहीतर जनतेची माफी मागा- निरूपम

कमला मिलमधील आगीप्रकरणी चौकशी करणारे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्यावर राजकीय दबाव असल्याचं विधान केलं होतं. परंतु हे वक्तव्य करून एक महिना उलटला तरी आयुक्तांनी 'त्या' राजकीय व्यक्तीचं नाव जाहीर केलेलं नाही.

दबाव टाकणाऱ्या 'त्या' नेत्याचं नाव जाहीर करा, नाहीतर जनतेची माफी मागा- निरूपम
SHARES

कमला मिलमधील आगीप्रकरणी चौकशी करणारे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्यावर राजकीय दबाव असल्याचं विधान केलं होतं. परंतु हे वक्तव्य करून एक महिना उलटला तरी आयुक्तांनी 'त्या' राजकीय व्यक्तीचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे हे वक्तव्य केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलेलं असून आयुक्तांनी या राजकीय व्यक्तीचं नाव जाहीर करावं, अन्यथा मुंबईकरांची जाहीर माफी मागावी, असं आव्हान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयुक्तांना दिलं.

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या या पत्रकार पारिषदेत महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, संदेश कोंडविलकर, भूषण पाटील आदी उपस्थित होते.


आयुक्तच जबाबदार

लोअर परळ येथील कमला मिलमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीच्या दुघर्टने १४ जणांचे बळी गेले. पण या घटनेला खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता हेच जबाबदार असल्याचं मी आधीही म्हटलं होतं आणि आताही तेच सांगत आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ही चौकशी सुरु असतानाच ५ जानेवारी रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खुद्द अजोय मेहता यांनी एका बड्या राजकीय नेत्याने फोन करून चौकशीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं.


स्मरणपत्र पाठवणार

हा खुलासा करताना त्यांनी या नेत्याची १७ हॉटेल्समध्ये भागीदारी असल्याचंही म्हटलं होतं. परंतु महिना उलटला तरी आयुक्तांनी या राजकीय नेत्याचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे याबाबत आपण स्मरणपत्र पाठवून त्यांना त्या राजकीय नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट

कमला मिल आग: प्रत्येक दोषीवर कारवाई करा, माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची याचिका


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा