Advertisement

घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी, पोलिसांनाही केली धक्काबुक्की

महापालिका कर्मचाऱ्यांनी या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यास सुरूवात करताच संतापलेल्या फेरीवाल्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. वाद वाढत गेल्यानंतर फेरीवाल्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकला. तेव्हा पोलिस वेळीच महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले. मात्र मुजोर फेरीवाल्यांनी पोलिसांनाही न जुनानता त्यांना देखील धक्काबुक्की केली.

घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी, पोलिसांनाही केली धक्काबुक्की
SHARES

रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी गुरूवारी घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळाली. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनाच त्यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर या मुजोर फेरीवाल्यांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली.


१५० मीटरच्या आत

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक परिसरापासून १५० मीटरच्या आता फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. त्यानुसार घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांचं एक पथक गुरूवारी गेलं होतं.


शिवीगाळ, धक्काबुक्की

त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांनी या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यास सुरूवात करताच संतापलेल्या फेरीवाल्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. वाद वाढत गेल्यानंतर फेरीवाल्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकला. तेव्हा पोलिस वेळीच महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले. मात्र मुजोर फेरीवाल्यांनी पोलिसांनाही न जुनानता त्यांना देखील धक्काबुक्की केली.

या प्रकरणी ३ फेरीवाल्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून एका फेरीवाल्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघांचा शोध पोलिस घेत आहेत.



हेही वाचा-

विरोधकांची बोलती बंद! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं हिंदीत भाषण

फेरीवाला धोरणाची नीट अंमलबजावणी करा नाहीतर.., राज यांचा आयुक्तांना इशारा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा