कट्टप्पा, बाहुबली आणि वाहतूक पोलीस

 Mumbai
कट्टप्पा, बाहुबली आणि वाहतूक पोलीस
Mumbai  -  

कट्टपानं बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाच्या उत्तराची उत्कंठा अनेकांना होती. याचं उत्तर 'बाहुबली 2' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळालंही. आता हाच उत्सुकतेचा विषय मुंबई पोलिसांनी उचलून धरलाय आणि तोही वेगळ्या शैलीत. आता तुम्ही विचाराल, हा सगळा प्रकार तरी काय?

कट्टपाने बाहुबलीला का मारलं? याव्यतिरिक्त आणखी एक प्रश्न आपल्या मुंबई पोलिसांनी  उपस्थित केला आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांना तुमच्याकडून अपेक्षित आहे. हा प्रश्न त्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना विचारलायाय. प्रश्न आहे- नागरिक वाहतूक नियम का पाळत नाहीत? झाला ना जांगडगुत्ता? या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर नक्की द्या. पण #BahubaliOfTrafficDiscipline हा हॅशटॅग वापरायला विसरू नका. मग चला की राव... विचार कसला करता? पोलीस काकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या की.

Loading Comments