Advertisement

बंद दाराआड जीवन मृत्यूचा दाहक खेळ! एका कुटुंबानं सर्वस्व गमावलं, तर दुसऱ्याला मिळालं जीवनदान!!


बंद दाराआड जीवन मृत्यूचा दाहक खेळ! एका कुटुंबानं सर्वस्व गमावलं, तर दुसऱ्याला मिळालं जीवनदान!!
SHARES

अंधेरीच्या मरोळ भागातील मैमून मेन्शन या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी बुधवारी रात्री बंद दाराआड जीवन मृत्यूचा दाहक अनुभव घेतला. इमारतीला लागलेल्या आगीत दरवाजाचं लाॅक न उघडल्याने तिसऱ्या मजल्यावरील कपासी कुटुंबातील ५ जणांपैकी ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर चौथ्या मजल्यावरील कोठारी कुटुंबाचा बंद दाराआड लपून बसल्याने जीव वाचला.   


नेमकं काय घडलं?

आग १२ वाजून ४५ मिनिटांनी लागली. तेव्हा सर्वजण झोपले होते. आधी तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आणि ही आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली. तिसऱ्या मजल्यावर जेव्हा आग लागली तेव्हा कपासी कुटुंबातील अब्बास कपासी शेजारच्यांचा दरवाजा ठोठावत राहिले. त्यादरम्यान त्यांच्या दरवाज्याचं मेन लॉक आतून बंद झालं. त्यामुळे झोपेत असलेले कपासी कुटुंबातील चौघे जण या आगीत होरपळले. अब्बास आत जाऊ न शकल्याने त्यांना कुटुंबातील इतरांना वाचवता आलं नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी संदीप येणगे आणि जॉन पिंटो यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.

तर, चौथ्या मजल्यावरील कोठारी कुटुंबियांपर्यंत बंद दारामुळे आगीची झळ न पोहोचल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती हजीफा कोठारी (२१) आणि हुसैन कोठारी (२६) यांनी दिली. 

आग लागल्यानंतर खूप आरडाओरड सुरू झाला आम्हाला बाजूच्या इमारतीतील लोक सांगत होते आग लागलीय. भीतीने आम्ही आमच्या घराचा दरवाजाच उघडला नाही. पण यामुळेच आमचं पूर्ण कुटुंब वाचलं, असं ते म्हणाले.

  



कोठारी कुटुंबातील चौघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सध्या होली स्पिरिट रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


आम्ही झोपलो होतो. अचानक आग लागली. मी दरवाजाजवळच झोपलो होतो. बिल्डिंगमध्ये आग लागलीय हे बाहेरचे लोक ओरडून सांगत होते. पण, आम्ही दरवाजाच उघडला नाही. म्हणून आम्ही वाचलो. अग्निशमनची गाडी ७५ मिनिटांनी आली.
- हजीफा कोठारी, जखमी


मी अभ्यास करत होतो. आई वडील झोपले होते. अचानक, जोरात आवाज झाला. आही बाहेर यायचा‌ प्रयत्न करत होतो. पण भावाच्या खोलीपर्यंत आग लागली होती. म्हणून आम्ही आतल्या खोलीतच राहीलो.
- हुसैन कोठारी, जखमी

या दोघांचे वडील इब्राहिम कोठारी सध्या आयसीयूमध्ये असून त्यांचीही प्रकृती सुधारत असल्याचं होली स्पिरिट रुग्णालयातील डॉ. विजय दलाले यांनी सांगितलं.

या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाच्या डोळ्यात धूर गेल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर, एकाला डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलीस उप आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.



हेही वाचा-

मरोळ भागातील निवासी इमारतीला आग, चौघांचा होरपळून मृत्यू


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा