महाराष्ट्र (maharashtra) सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin scheme) सुमारे पाच लाख लाभार्थ्यांना अपात्र घोषित केले आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (aditi tatkare) यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या सहा महिन्यांत बँक खात्यात जमा झालेले पैसे त्यांच्याकडून परत घेतले जाणार नाहीत.
जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान या पाच लाख महिलांच्या खात्यात 450 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 65 वर्षांपर्यंतच्या ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात.
या योजनेत पात्र होण्यासाठी, लाभार्थ्यांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी नसावा तसेच त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे आणि त्यांना इतर कोणत्याही सरकारी योजनेतून मासिक मदत मिळत नसावी. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या या योजनेचा फायदा 2.46 कोटी महिलांना होतो.
नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती (mahayuti) सरकार पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तेत आले. सत्तेत येताच सरकारकडून नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. तथापि, राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने या उपक्रमांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
हेही वाचा