Advertisement

मेट्रोसाठी २४ भूखंडांचे आरक्षण बदलणार


मेट्रोसाठी २४ भूखंडांचे आरक्षण बदलणार
SHARES

मुंबईत मेट्रोसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार गुंदवली, चकाला, मालाड, आकुर्ली, मागाठाणे, दहिसर, येथील जमिनींचे आरक्षण बदलून या जागा मेट्रोसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सरकारने महापालिकेच्या सुधार समितीच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.

मेट्रो रेल्वे ७ च्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो रेल्वेसाठी स्थानक, प्रवेशाचा आणि बाहेर जाण्याच्या मार्ग, लिफ्ट आदींसाठी या जमिनींचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व जमिनीवर सध्या समाज कल्याण, रस्ता रुंदीकरण, शासकीय कर्मचारी निवासस्थान, परवडणारी घरे, आदींसाठी आरक्षण आहे.

या २४ आरक्षित भूखंडापैकी गुंदवली, चकाला, मालाड, आकुर्ली, मागाठाणे आणि दहिसर आदी ठिकाणी मेट्रोची स्थानके बनवली जाणार आहेत. आरक्षणाचा हा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

यापूर्वी मेट्रोला १२ भूखंड कायमस्वरूपी तसेच भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने राखून ठेवला होता. झाडांची कत्तल करून विकास करण्याच्या या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या प्रस्तावलाही विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.



हे देखील वाचा -

मुंबईत वृद्धाश्रमांची गरज वाढतेय, वृद्धाश्रमांकरीता २८ भूखंडाचे आरक्षण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा