Advertisement

गिरगाव चौपाटी ‘लेझर शो’ने उजळणार

गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक उद्यानासमोर हा ‘लेझर शो’ पाहता येणार आहे.

गिरगाव चौपाटी ‘लेझर शो’ने उजळणार
SHARES

मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेली गिरगाव चौपाटी आता मनमोहक ‘लेझर शो’ने उजळणार आहे. शिवाय या ठिकाणी वॉटर कर्टेन, सेल्फी पॉइंटही तयार करण्यात येणार आहे. सण-उत्सवाप्रमाणे या ‘लेझर शो’ची थीम राहणार आहे. गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक उद्यानासमोर हा ‘लेझर शो’ पाहता येणार आहे.

मुंबईला स्वच्छ-सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील रस्ते, उड्डाणपुलांखाली पेंटिंग, सौंदर्यीकरण, लायटिंगची कामे केली जातील.

शिवाय मोठय़ा भिंती, मान्यवरांचे पुतळय़ाचे पेंटिंग, लायटिंग करण्यात येईल. तसेच माहीम, वांद्रे आणि शिवडी किल्ल्यांचे सौंदर्यीकरण, लायटिंग करण्यात येईल. कोळीवाडे, जेट्टी, फुटपाथचे सौंदर्यीकरण, पालिकेच्या 850 गार्डनचे सुशोभीकरण, रात्रीच्या वेळी आकर्षक लायटिंग करण्यात करण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. यासाठी सुमारे एकूण दोन हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे.

मरीन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटी असा तीन किमीचा परिसर दररोज हजारो पर्यटकांच्या उपस्थितीमुळे गजबजलेला असतो. त्यामुळे गिरगाव चौपाटी येथील लेझर शो पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

या ठिकाणी पालिकेकडून स्वच्छता राखली जात असून 30 सीटर बायोटॉयलेटही तयार करण्यात आले आहे. जवळच आकर्षक ह्युइंग गॅलरीही बनवण्यात आल्याने पर्यटकांना अथांग समुद्राचे दर्शन घेता येत आहे.

सिंगापूर, बँकॉकच्या धर्तीवर काम

सिंगापूर आणि बँकॉकच्या धर्तीवर हा लेझर शो उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी पालिका सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. हे काम करणाऱया पंत्राटदाराला ही सुविधा पुरवण्याबरोबच देखभाल-दुरुस्तीचे कामही करावे लागणार आहे.


हेही वाचा

Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा

बोरिवली-ठाणे प्रवासासाठी लागणार २० मिनिटे, नॅशनल पार्कमध्ये बांधणार सर्वात लांब बोगदा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा